इंडियन रेल्वेची सर्वसामान्यांसाठी वंदे साधारण ट्रेन, नवीन लूक; भाडेही खूपच कमी

Vande Sadharan Train: वंदे भारत साधारण ट्रेनमध्ये 24 LHB कोच बसवले जाणार आहेत. बायो व्हॅक्यूम टॉयलेट्स, पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टीम आणि चार्जिंग पॉइंट्सदेखील दिले जाणार आहेत. यासोबतच ट्रेनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. 

| Sep 15, 2023, 15:00 PM IST

Vande Sadharan Train:वंदे साधारण ट्रेनसाठी डबे बनवण्याची प्रक्रिया सुरु असून चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) हे काम केले जात असल्याची माहिती समोर आली आहे. तकाही महिन्यांतच ट्रेनचे डबे बनविण्याची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. 

1/8

इंडियन रेल्वेची सर्वसामान्यांसाठी वंदे साधारण ट्रेन, नवीन लूक; भाडेही खूपच कमी

Indian Railway Vande Sadharan Train New look low different from Vande Bharat

Indian Railway Vande Sadharan Train: सध्या देशात वंदे भारत ट्रेनची चर्चा आहे.  वेगवान आणि रॉयल लूक असल्याने देशभरातील प्रवाशांची या ट्रेनला पसंती मिळत आहे. पण जास्त भाडे असल्याने सर्वसामान्यांनी याकडे पाठ फिरवल्याचे निदर्शनास आले आहे. 

2/8

सामान्य नागरिकांसाठी

Indian Railway Vande Sadharan Train New look low different from Vande Bharat

आता भारतीय रेल्वे बोर्डाने नागिरकांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. सामान्य नागरिकांसाठी भारतीय रेल्वेने वंदे साधारण ट्रेन सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वसामान्य जनतेचा विचार करुन ही ट्रेन चालविण्यातत येणार आहे. 

3/8

सर्वसामान्यांना परवडणार

Indian Railway Vande Sadharan Train New look low different from Vande Bharat

या ट्रेनचे भाडे वंदे भारत ट्रेनपेक्षा कमी असेल. जास्त भाडे असल्याने अनेकांना या ट्रेनमध्ये प्रवास करता आला नाही. ही बाब लक्षात घेऊन रेल्वेने 'वंदे साधरण' चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

4/8

डबे बनवण्याची प्रक्रिया

Indian Railway Vande Sadharan Train New look low different from Vande Bharat

वंदे साधारण ट्रेनसाठी डबे बनवण्याची प्रक्रिया सुरु असून चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) हे काम केले जात असल्याची माहिती समोर आली आहे. तकाही महिन्यांतच ट्रेनचे डबे बनविण्याची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. 

5/8

कोणत्या सुविधा?

Indian Railway Vande Sadharan Train New look low different from Vande Bharat

वंदे भारत साधारण ट्रेनमध्ये 24 LHB कोच बसवले जाणार आहेत. बायो व्हॅक्यूम टॉयलेट्स, पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टीम आणि चार्जिंग पॉइंट्सदेखील दिले जाणार आहेत. यासोबतच ट्रेनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. याशिवाय ऑटोमॅटिक डोअर सिस्टिमची सुविधाही उपलब्ध होणार आहे.

6/8

ट्रेनमध्ये कमी थांबे

Indian Railway Vande Sadharan Train New look low different from Vande Bharat

वंदे साधारण ट्रेन्सचा वेग मेल आणि एक्स्प्रेसपेक्षा जास्त असेल आणि त्यासोबतच थांबेही कमी असतील. याशिवाय स्वयंचलित दरवाजांची सुविधाही प्रवाशांना मिळू शकणार आहे. 

7/8

दोन ट्रेनमधील फरक

Indian Railway Vande Sadharan Train New look low different from Vande Bharat

वंदे भारत आणि सामान्य वंदे भारत ट्रेनमधील फरक समजून घेणे महत्त्वाचे आहे. ही ट्रेनही शताब्दी आणि जनशताब्दीसारखी असेल. शताब्दी ट्रेन सुरू झाली तेव्हा तिचं भाडं जास्त होतं, पण त्यानंतर सर्वसामान्यांसाठी रेल्वेनं जनशताब्दी ट्रेन सुरू केली, ज्याचं भाडं कमी होतं, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्याने दिली.

8/8

किती असू शकते भाडे ?

Indian Railway Vande Sadharan Train New look low different from Vande Bharat

जेणेकरून गरीब प्रवाशांनाही वंदे भारत ट्रेनमध्ये प्रवास करता यावा यासाठी ही ट्रेन बनविण्यात आली आहे. यासोबतच या लोकांना ट्रेनमध्ये सर्व सुविधा मिळू शकतात. या ट्रेनचे भाडे वंदे भारत एक्सप्रेसपेक्षा खूपच कमी असेल. सध्या भाड्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही. साधी वंदे भारत ट्रेन खास करून सर्वसामान्यांचा विचार करुन बनवली जाईल, असे सांगण्यात आले आहे.