मनोरंजन थांबलं नाही, थांबणार नाही!.... झी मराठीचं 'या' ठिकाणी शुटिंग सुरू
हा प्रवास आम्ही करतोय तो फक्त प्रेक्षकांचा मनोरंजनाचा प्रवास खंडित न होता, अजून मनोरंजक व्हावा म्हणून
मुंबई : देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशावेळी महाराष्ट्रात लॉकडाऊनचा निर्णय घेऊन नियमावली कठोर करण्यात आली. यामध्ये मालिका, सिनेमांच्या चित्रिकरणावर पूर्णपणे बंदी आणण्यात आली आहे. त्यामुळे मराठी मालिकादेखील महाराष्ट्राची वेस ओलांडून परराज्यात चित्रीकरण करतायत. हा प्रवास आम्ही करतोय तो फक्त प्रेक्षकांचा मनोरंजनाचा प्रवास खंडित न होता, अजून मनोरंजक व्हावा म्हणून.