ZIM vs USA : टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड कायम, झिम्बाब्वेचा वन-डे इतिहासात दुसरा सर्वात मोठा विजय

World Cup 2023 Qualifiers : ICC विश्वचषक पात्रता 2023 चा 17 वा सामना झिम्बाब्वे क्रिकेट संघ आणि UAE यांच्यात खेळला गेला. या सामन्यात झिम्बाब्वे संघाने एकदिवसीय इतिहासातील दुसरा सर्वात मोठा विजय नोंदवला. हा सामना झिम्बाब्वेच्या हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळला गेला. या मैदानावर टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड  मोडता मोडता राहिला.

| Jun 27, 2023, 07:39 AM IST
1/5

दोन्ही संघांदरम्यान खेळल्या गेलेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेने 50 षटकात 6 गडी गमावून 408 धावा केल्या. या सामन्यात झिम्बाब्वेकडून कर्णधार शॉन विल्यम्सने कर्णधारपदाची खेळी खेळली.

2/5

409 धावांच्या टार्गेट घेऊन मैदानात उतरलेल्या अमेरिकेचा संघ 104 धावांत ऑलआऊट झाला आणि झिम्बाब्वेने हा सामना 304 धावांनी जिंकला. पुरुषांच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय इतिहासातील हा दुसरा सर्वात मोठा विजय ठरला.

3/5

 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय इतिहासातील सर्वात मोठ्या विजयाचा विक्रम भारतीय संघाच्या नावावर आहे. टीम इंडियाने जानेवारी 2023 मध्ये श्रीलंकेचा 317 धावांच्या फरकाने पराभव केला होता.

4/5

झिम्बाब्वेचा कर्णधार शॉन विल्यम्सने खेळलेल्या 174 धावांच्या झंझावाती खेळीच्या जोरावर झिम्बाब्वेने एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात मोठी धावसंख्या उभारली. याआधी झिम्बाब्वे क्रिकेट संघाने वनडे क्रिकेटमध्ये 400 धावांचा आकडा गाठला नव्हता.

5/5

झिम्बाब्वे 1983 पासून एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे. याआधी, झिम्बाब्वेचा वनडेमध्ये सर्वोच्च धावसंख्या 351 होती. झिम्बाब्वे 2009 मध्ये केनियाविरुद्ध केली होती.