Pune: सुनेने सासूची हत्या करुन ४ दिवस प्रेत छतावर ठेवलं, नंतर आग लावली...पण चूक केलीच

आई आणि मुलाच्या नात्याला लाज आणणारी घटना पुणे जिल्ह्यातील तळेगावात घडली आहे. 

Updated: May 25, 2021, 02:26 PM IST
Pune: सुनेने सासूची हत्या करुन ४ दिवस प्रेत छतावर ठेवलं, नंतर आग लावली...पण चूक केलीच  title=

पुणे : आई आणि मुलाच्या नात्याला लाज आणणारी घटना पुणे जिल्ह्यातील तळेगावात घडली आहे. आपसातील भांडणांमुळे आधी सुनेने सासूची हत्या केली. नंतर मृत महिलेचा मुलगा म्हणजेच तिच्या नवऱ्याने घराच्या छतावर 4 दिवस मृतदेह लपवून ठेवला. मृतदेहाचा दुर्गंध येऊ लागल्यावर मृतदेह कचऱ्यासह जाळून टाकण्यात आला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये टिपली गेली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट दिसत आहे की, बेबी गौतम नामक महिलेला झाडांमधून ओढत नेले जात आहे. या फुटेजच्या आधारे मृत महिलेची सून आणि मुलगा मिलिंग शिंदेला अटक करण्यात आली आहे.

आपसांतील भांडणांमुळे हत्या

पोलिसांच्या मते सून आणि सासूमध्ये नेहमी भांडणं होत असत. शुक्रवारी या दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. हाणामारीदेखील झाली. सासूने संतापात नातवाला कानशिलात लगावली. त्यानंतर सूनेने संतापात सासूचा गळा दाबून हत्या केली.

सूनेने मृतदेहाला कचऱ्यात जाळले

तिने आपल्या पतीसह सासूच्या मृतदेहाला एका पोत्यात टाकून छतावर ठेवले. परंतु तीन-चार दिवसांनी नियोजनानुसार झाडांच्या फांद्यासह बाहेर ओढून नेऊन जाळण्यात आले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याने घटनेचा उलगडा झाला.