MPSC Exam postpone : पुण्यात विद्यार्थ्यांचं जोरदार आंदोलन, परीक्षेला 'तारीख पे तारीख' विद्यार्थी आक्रमक

एमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थी आक्रमक पाहायला मिळत आहेत. 

Updated: Mar 11, 2021, 03:47 PM IST
MPSC Exam postpone : पुण्यात विद्यार्थ्यांचं जोरदार आंदोलन, परीक्षेला 'तारीख पे तारीख' विद्यार्थी आक्रमक title=

पुणे : शिक्षणाचं माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यात एमपीएससी ( mpsc ) राज्यसेवा पूर्व परीक्षेचे परीक्षार्थी आक्रमक झाले आहेत. एमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थी आक्रमक पाहायला मिळत आहेत. पुण्यात पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी रस्त्यावर आले आहेत, विद्यार्थ्यानी रस्त्यावरच ठिय्या मांडला आहे. एमपीएससीचे 2 लाख 63 हजार विद्यार्थी परीक्षा देणार होते. 

एमपीएससीकडून 14 मार्च 2021 रोजी परिक्षा घेतली जाणार होती, ती वेळोवेळी पुढे ढकलण्यात आली आहे. ही पाचवी वेळ आहे जेव्हा ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली, कोरोनामुळे या परीक्षा पुढे ढकलण्याचं कारण देण्यात आलं आहे.

विद्यार्थ्यांना थोपवण्याचा जोरदार प्रयत्न पुणे पोलिसांकडून होत आहे, पण विद्यार्थ्यांनी आपली घोषणाबाजी आणि ठिय्या सुरुच ठेवली आहे.

पुण्यात कोरोना वाढत असतानाही विद्यार्थ्यांनी कोणतीही तमा न बाळगता आपलं आंदोलन सुरु ठेवलं आहे. हे विद्यार्थी पाच-पाच वर्ष पुण्यात राहून एमपीएससीचा अभ्यास करतात. मात्र ऐनवेळेस ही परीक्षा पुढे ढकलली गेल्याने विद्यार्थी आक्रमक झाले आहेत.