मुंबई : आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी पितृपक्षाच्या दरम्यान शांतीची प्रार्थना केली जाते. हा श्राद्ध काळ भाद्रपद शुक्लपक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो तो आश्विन कृष्णपक्षाच्या आमावस्येला संपतो. पितृपक्षाच्या शेवटच्या दिवसाला सर्वपित्री आमावस्या असं म्हणतात. ज्यांच्या मरणाची तारीख माहित नसते अशा सर्वांचे पिंडदान यादिवशी करण्यात येतं.
पितृपक्षादरम्यान ब्राम्हणांना भोजन देणं आणि दान देण शुभ मानलं जातं. मुलगा किंवा सुनेला पिंडदान करता येत. दुसऱ्याच्या घरामध्ये श्राद्धाचे विधी करता येत नाहीत. ज्यांचा मृत्यू पौर्णिमेच्या दिवशी झालाय अशांचे पिंडदान पितृपक्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे पौर्णिमेला होतं. आजपासून पितृपक्षाला सुरूवात होत आहे. अशावेळी पौर्णिमेनंतर श्राद्ध करण्याची कोणती वेळ शुभ आहे याबद्दल जाणून घेऊया...
तिथी - पौर्णिमा,24 सप्टेंबर 2018 सोमवार
कुतूप मुहूर्त - 11 वाजून 48 मि ते 12 वाजून 36 मिनिटांपर्यंत
रौहिण मुहूर्त- 12 वाजून 36 मि. ते 1 वाजून 24 मि. पर्यंत
अपराहन काळ- 1 वाजून 24 मि ते 15 वाजून 48 मि. पर्यंत