IND vs Aus Live Streaming: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा पहिला सामना कधी आणि कुठे पाहता येईल? जाणून घ्या

India vs Australia Test 2024-25 Live Streaming Telecast Channel : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी शुक्रवारपासून सुरू होत आहे.

तेजश्री गायकवाड | Updated: Nov 22, 2024, 07:41 AM IST
IND vs Aus Live Streaming: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा पहिला सामना कधी आणि कुठे पाहता येईल? जाणून घ्या title=
Photo Credit: ICC / X

IND vs Aus 1st Test BGT 2024-25 Live Streaming: बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सामने शुक्रवारपासून सुरू होत आहे. दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. यावेळी भारतीय संघाची नजर ही ऑस्ट्रेलियात सलग तिसरी कसोटी मालिका जिंकण्यावर असेल. ऑस्ट्रेलिया संघही उत्तम खेळ दाखवण्यासाठी सज्ज असेल. भारताने 2018-19 आणि 2020-21 या दोन्ही दौऱ्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता.

आहे बहुप्रतिक्षित कसोटी मालिका 

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी हे बहुप्रतिक्षित कसोटी मालिकेची दोन्ही संघांचे चाहते वाट पाहत आहेत. 2018 पूर्वी, भारताने ऑस्ट्रेलियामध्ये कधीही कसोटी मालिका जिंकली नव्हती. पण गेल्या दोन सिजनमध्ये त्यांनी ऑस्ट्रेलिया संघावर वर्चस्व राखले आहे. भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा सलामीच्या सामन्यासाठी नसला तरी तो मालिकेतील उर्वरित चार सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व करेल. अलीकडेच झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताला 0-3 असा निराशाजनक पराभव स्वीकारावा लागला होता. यामुळे आता भारतीय टीमला भूतकाळातील कामगिरीवरून प्रेरणा घेऊन या मालिकेत उत्तम काम करता येईल.  

पहिला सामना कधी खेळला जाईल?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना शुक्रवार, 22 नोव्हेंबरपासून खेळवला जाणार आहे.

या मालिकेतील पहिला सामना कोठे खेळवला जाईल?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी  पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पर्थ येथील पर्थ स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना कधी सुरू होईल?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 7.50 वाजता सुरू होईल. याच्या अर्धा तास आधी म्हणजेच सकाळी ७.२० वाजता नाणेफेक होईल.

कोणत्या टीव्ही चॅनलवर बघता येणार मालिकेतील पहिला सामना?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेचे प्रसारण करण्याचे अधिकार स्टार स्पोर्ट्सकडे आहेत.

पहिल्या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग कोठे उपलब्ध असेल?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना डिस्ने हॉटस्टार ॲपवर (Disney+ Hostar) ऑनलाइन पाहता येईल.