गर्लफ्रेंड नाहीये...यामागे हे कारण तर नाही?

जीवनात प्रत्येक व्यक्तीला असा एका व्यक्तीची गरज असते ज्याला ती आपला म्हणू शकेल. त्याच्यासोबत जीवनातील सुख:दुख शेअर करता येतील.

Updated: Jun 4, 2018, 06:30 PM IST
गर्लफ्रेंड नाहीये...यामागे हे कारण तर नाही?

मुंबई : जीवनात प्रत्येक व्यक्तीला असा एका व्यक्तीची गरज असते ज्याला ती आपला म्हणू शकेल. त्याच्यासोबत जीवनातील सुख:दुख शेअर करता येतील. आनंदाचे क्षण घालवता येतील अशी व्यक्ती आयुष्यात हवी असते. मात्र असं म्हणतात की प्रेम केवळ नशीबवान लोकांच्या नशिबात असते. मात्र नशिबामुळेच नव्हे तर अशी आणखी काही कारणे असतात ज्यामुळे तुम्ही सिंगल राहता. जाणून घ्या या गोष्टी...

१. प्रेम म्हणजे समर्पण. एखाद्या व्यक्तीसाठी मनापासून दिलेला वेळ. जर तुम्हाला वेळ खर्च करणे आवडत नाही तर एखादी मुलगी तुमची गर्लफ्रेंड होऊ शकते मात्र नाते टिकेल की नाही माहीत नाही. प्रेमात दोघांची मर्जी गरजेची असते. तडजोड करावी लागते.

२. माणसाला एकटेपणाची भिती वाटते. मात्र एकदा त्याला हे एकटेपण आवडू लागले तर त्याला त्याची सवय होऊन जाते. मग एखादी व्यक्ती आयुष्यात आली वा न आली तितकासा काही फरक पडत नाही. 

३. जर तुम्ही जुन्या गर्लफ्रेंडच्या आठवणीत रमला आहात त्यातून बाहेर पडायचे नाहीये तर नव्या नात्यात तुम्ही गुंतता कामा नये. भूतकाळ विसरुन वर्तमानकाळात जगायला शिका. 

५. तुमच्या स्वभावावरही हे अवलंबून आहे. तुमचा स्वभाव जर सतत चिडखोर असेल तर मुलींना अशा स्वभावाची मुले आवडत नाहीत. 

६. प्रत्येक नात्यात सन्मान हवा असतो. समोरच्या व्यक्तीला नात्यात सन्मान देणे गरजेचे असते.