आयुष्यात चुकूनही राहू नका Single, आहेत हे मोठे तोटे

Single राहणं पसंत करणाऱ्यांनी एकदा हा बातमी वाचाच .

Updated: Aug 29, 2022, 01:48 PM IST
आयुष्यात चुकूनही राहू नका Single, आहेत हे मोठे तोटे  title=

Drawbacks of Being Single : नात्यांवरचा विश्वास कमी झाल्यामुळे अनेकजण सिंगलं राहणं पसंत करतात. सिंगल राहिलं तर आपण दबावात किंवा बंधनात अडकत नाही. सिंगल राहून आपण आपल्या जीवनाचा चांगल्या प्रकारे आनंद घेऊ शकतो. काहीजण तर सर्व नात्यांपासून लांब राहण्याचा प्रयत्न करतात तर काही काही करियर बनवण्याच्या नादात तर काही वेळेअभावी नात्यांपासून दूर राहतात.  पण अशा एकाकीपणामुळे अनेक तोटेही होऊ शकतात.

नैराश्याचे बळी होऊ शकता-
सिंगल राहून तुम्ही तुमची काम व्यवस्थितपणे पार पाडू शकता. मात्र तुम्ही त्या कामाचं आनंद किंवा दुःख ही वाटू शकत नाही. सिंगल राहिल्याने तुम्ही तुमच्या अडचणीही कोणाला शेअर करू शकत नाहीत. असं करण्यामुळे तुम्ही डिप्रेशनमध्ये जावू शकता. तुमचं काम हे ताण-तणावाचं असेल तर तुम्ही नैराश्याचे बळी होऊ शकता.

भावनिकदृष्ट्या कमकुवत-
जर तुम्ही एखाद्यासोबत रिलेशनशिपमध्ये असाल तर तुम्ही एकमेकांच्या समस्या शेअर करू शकता आणि सल्ला घेऊन ते सोडवू शकता. एकटं राहिल्याने सर्व समस्या स्वतःच सोडवाव्या लागतात. अशा परिस्थितीत तुम्ही भावनिकदृष्ट्या कमकुवत होतात. जेव्हा कोणाचाही आधार मिळत नाही तेव्हा तुम्ही नाराज होतात आणि छोट्या छोट्या गोष्टींवर तुम्हाला रडू येतं.

सर्वांपासून दूर जाता
एकटं राहिल्याने चिडचिड वाढते, तुम्ही लोकांमध्ये मिसळणं विसरून जाता. बर्‍याच वेळा सिंगल राहिल्यामुळे तुमची सर्वांसोबत राहण्याची सवय सुटते. त्यामुळे तुम्ही कोणत्याही नात्यात जुळवून घेऊ शकत नाही. एकटे राहून हळूहळू घर, कुटुंब आणि समाजापासून दूर जाऊ शकता. 

आजार

एकटं राहून तुम्ही आनंदी कमी आणि तणावामध्ये जास्त राहू लागता. तणावामुळे तुमच्या झोपेवरही परिणाम होऊ शकतो. याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो. अशक्तपणा, थकवा, पचनाच्या समस्या, डोके जड होणं अशा आजारांचा सामना करावा लागू शकतो. चिडचिड ही तुमची सवय बनते आणि तुम्ही तुमचं कामही शांतपणे करू शकत नाही.