Women Attraction : पुरुषांमध्ये अनेक गुण असतात. यातील काही गुण चांगले तर काही गुण वाईट असतात. मात्र पुरुषांमध्ये असे काही गुण असतात, ज्यामुळे महिला त्यांच्याकडे आकर्षित होऊ लागतात. स्त्रिया पुरुषांमधील काही व्यावहारिक गोष्टी पाहून त्यांच्याकडे आकर्षित होतात, असे वैज्ञानिक संशोधनातून समोर आलंय.
चला जाणून घेऊया पुरुषांचे कोणते असे गुण आहेत ज्यामुळे महिला त्यांच्याकडे आकर्षित होताना दिसतात. एका अभ्यासात असं दिसून आलंय की, स्त्रिया त्यांच्यापेक्षा मोठ्या असलेल्या पुरुषांकडे आकर्षित होतात.ब्रिटनमधील एका अभ्यासानुसार, आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र महिलांना आत्मविश्वासाने भागीदार सापडतात आणि ते वृद्ध पुरुषांना प्राधान्य देतात.
कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांनी ऑनलाइन डेटिंग साईटवर 60 पुरुष आणि 60 महिलांचा अभ्यास केला. या अभ्यासातून असं दिसून आलं की, स्त्रिया किंवा पुरुष त्यांच्या व्यक्तिमत्त्वाशी जुळणारे लोक पटकन आकर्षित होतात.
चीन, इंग्लंड, जर्मनी आणि अमेरिकेतील लोकांवर केलेल्या एका अभ्यासानुसार, महिला लाल रंगाचे कपडे घालणाऱ्या पुरुषांकडे सर्वाधिक आकर्षित होतात. संशोधनात महिलांनी लाल रंगाचे कपडे घातलेले पुरुष आणि इतर रंगीत कपडे घातलेले पुरुष असे फोटो दाखवले. या अभ्यासातून असं समोर आलंय आहे की, बहुतांश महिलांना लाल शर्ट किंवा टी-शर्ट घालणारे पुरुष आवडतात.
इंटरनॅशनल जर्नल ऑफ कॉस्मेटिक सायन्समध्ये प्रकाशित झालेल्या स्टडीसानुसार, काही पुरुषांना सुगंधित डिओडरेंट दिलं तर काही लोकांना सुगंधित स्प्रे देण्यात आला. यावेळी सुगंधित स्प्रे वापरणार्या पुरुषांना महिलांनी अधिक पसंती दिल्याचं दिसून आलं.
न्यू साउथ वेल्स विद्यापीठातील एक अभ्यासानुसार, ज्या पुरुषांची दाढी मोठी असते अशा पुरुषांकडे अधिक महिला आकर्षित होत नाहीत. अभ्यासानुसार, स्त्रिया किंचित वाढलेल्या दाढी असलेल्या पुरुषांकडे जास्त आकर्षित होतात.
कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीमध्ये 286 महिलांवर केलेल्या संशोधनातून असं समोर आलंय की, की, महिलांना सामान्य बॉडी असणारे पुरुष जास्त आवडतात. या अभ्यासादरम्यान महिलांना काही शर्टलेस पुरुषांचे फोटो दाखवण्यात आले. यावेळी महिलांनी जास्त मसल्स असलेल्या पुरुषांना शॉर्ट टर्म पार्टनर तर सामान्य मसल्स असलेल्या पुरुषांची निवड लाँग टर्म पार्टनर म्हणून केल्याचं दिसून आलं.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती विविध विद्यापीठातील संशोधनावर आधारित आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)