Women Thoughts During Sex : प्रत्येक जोडप्यासाठी शारीरिक संबंध ही गोष्ट खूप खास असते. ज्यावेळी एखादं कपल इंटीमेट होतं, त्यावेळी त्या दोघांच्याही डोक्यात काही वेगळे विचार सुरु असण्याची शक्यता असते. शारीरिक संबंधांमधून प्लेजर मिळालं ही जोडप्याची इच्छा असते. त्यामुळे यावेळी जोडप्यांच्या डोक्यामध्ये ज्या काही गोष्टी सुरु असतात त्या प्लेजरशी संबंधीत असू शकतात.
खासकरून महिला संबंध ठेवताना, फक्त सेक्सचा विचार करण्याऐवजी त्या इतर अनेक गोष्टी मनात आणतात. महत्त्वाचं म्हणजे, महिलांच्या डोक्यात कोणत्या गोष्टींचा विचार सुरु आहे, याची अधिकतर पुरुषांना मात्र माहिती नसते. जाणून घेऊया संबंध ठेवताना महिला काय विचार करतात.
शरीराला येणारा गंध
हे वाचून तुम्हाला थोडसं विचित्र वाटेल, मात्र महिला संबंधांदरम्यान शरीराच्या गंधाचा विचार करत असतात. गंधाच्या बाबतीत महिला खूप संवेदनशील असतात. ज्यावेळी अचानक जोडीदाराशी जवळीक वाढू लागते, तेव्हा त्यांच्या तोंडातून किंवा शरीरातून कोणत्या प्रकारचा गंध येत असेल हा विचार त्यांच्या मनात घुटमळू लागतो.
कपड्यांसंदर्भातील विचार
पुरुषांना ही गोष्ट फार छोटी वाटू शकते, परंतु महिला कितीही उत्तेजित असली तरी ती तिच्या कपड्यांमध्ये खूप विचार करते. खासकरून ती तिच्या अंडर-गारमेंट्सबाबत विचार करते. महिलेला प्रत्येक कपड्यांमध्ये आकर्षक दिसायचं असतं. त्यामुळे त्या अनुषंगाने ती कपडे परिधान करते. त्यामुळे संबंधांदरम्यान तिच्या डोक्यात याबाबत विचार सुरु असतात.
इंटीमेट पार्ट संदर्भात
महिलांसाठी स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे. महिलांना प्रायव्हेट पार्ट संबंधित इन्फेक्शन लवकर होतात. त्यामुळे पुरुष जोडीदाराने आंघोळ न करता संबंध ठेवले आहेत, की नाही याबाबत महिला अनेकदा विचार करतात. यामागे आपल्याला कोणताही संसर्ग होऊ नये हा विचार असतो.
सेक्सनंतर काय?
ऑर्गेझमच्या जवळ येत असल्याचं मुलींच्या लक्षात येताच त्या सेक्सनंतर काय होईल याचा विचार त्यांच्या डोक्यात येऊ लागतो. ज्यावेळी महिला त्यांच्या जोडीदारासोबत पहिल्यांदाच जवळीक साधत असतात त्यावेळी सेक्सनंतर नेमकं काय करायचं हा प्रश्न त्यांना सतावू लागतो.