मुंबई : प्रत्येक नात्यामध्ये विश्वास असावा लागतो. कोणतंही नातं हे विश्वासावरच टिकतं. जर तुमच्या बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंडकडून तुमची काळजी करणं कमी झालं असेल. तर समजा जा की तुमच्या नात्यात काहीतर गडबड आहे. आज आम्ही तुम्हाला तुमचा बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंडला तुमच्यामध्ये रस आहे की नाही हे ओळखण्याच्या काही टीप्स देणार आहोत.
जोडीदाराची साथ नसणं
खास प्रसंगी जेव्हा जोडीदाराची साथ हवी असते तेव्हाच नेमकं जोडीदार सोबत येणं टाळतो. म्हणजेच खास प्रसंगी एकटं राहणं हे नातेसंबंधात एका जोडीदाराचं दुर्लक्ष असल्याचे संकेत आहेत.
रोज बहाणे बनवणं
जर तुमचा जोडीदार तुमच्या प्रश्नांचं उत्तर देणं टाळत असेल किंवा तुमच्या चांगल्या गोष्टींवरही चिडत असेल तर त्याच्या मनात काही तरी वेगळंच सुरू आहे. तेव्हा तुमच्यातील अंतर वाढण्याचे लक्षण आहे.
दुसऱ्याला समस्या सांगणं
जेव्हा तुम्ही आपल्या समस्या इतरांसोबत शेअर करू लागता तर त्याचा अर्थ असा होतो की, तुमच्या जोडीदाराला तुमच्यात रस नाहीये.
काळजी न करणं
जर तुमचा जोडीदार तुमची काळजी करत नसेल तर त्याचा अर्थ तुमची त्याला गरज नाहीये
प्रेम व्यक्त न करणं
जर तुमच्या दोघांत प्रेमळ भावना किंवा प्रेम व्यक्त केले जात नसेल तर हे सुध्दा संकेत आहे.
फोन न करणं
जर तुमच्या जोडीदाराच तुम्हाला फोन करणं कमी झाल असेल तर समजून जा की त्याचे तुमच्यावरचं प्रेम कमी होऊ लागलं आहे.
नकारात्मक विचार
जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराबद्दल नकारात्मक विचार करायला लागला तेव्हा समजून जा की नात्यात प्रेम नाहीये.
काही फरक पडत नाही
जोडीदार आपल्यासोबत असो किंवा नसो आपल्याला काही फरक पडत नाही असे असेल तर त्याचा अर्थ स्पष्ट आहे
असुरक्षित वाटणं
तुम्ही जोडीदारासोबत कम्फर्टेबल नसाल तर तुम्ही एकतर्फी नातेसंबंधात असल्याचे लक्षण आहे.