1/8
मन्ना डे यांना श्रद्धांजली
मन्ना डे यांचे मुळ नाव प्रबोधचंद्र डे. रवींद्र संगीताची जन्मभूमी असलेल्या कोलकात्यात एक मे १९१९ रोजी त्यांचा जन्म झाला. सुमधूर रवींद्र संगीताचा त्यांच्यावर विलक्षण प्रभाव आहे. ९४ वर्षे वयाच्या मन्ना डे यांनी हिंदीसह बंगाली, भोजपूरी, मगध, पंजाबी, मराठी, मैथिली, आसामी, उडिया, गुजराती, कोकणी, कन्नड, मल्याळी, अवधी, छत्तीसगढी अशा विविध भाषांमध्ये संगीत आणि पार्श्वधगायन केले.
2/8
3/8
प्रसिद्ध सतारवादक पंडित रविशंकर यांना श्रद्धांजली
पं. रविशंकर यांचे भारतीय शास्त्रीय संगीत पाश्चिमात्त्य जगतात लोकप्रिय करण्यात फार मोठे योगदान होते. निष्णात सतारवादक असलेल्या पं. रविशंकर यांनी ‘द बीटल्स’चे जॉर्ज हॅरीसन, व्हायोलीनवादक येहुदी मेनुहीन अशा जागतिक कीर्तीच्या कलाकारांसमवेत त्यांनी कार्यक्रम केले होते. त्यातून त्यांना जगप्रसिद्धी मिळाली. तिचा लाभ घेत त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीत पाश्चात्त्य जगतात लोकप्रिय करण्यासाठी अथक परिश्रम केले.
4/8
गझल किंग जगजित सिंह यांना चित्ररूपी श्रद्धांजली
गझलला सामान्य लोकांमध्ये लोकप्रिय बनवण्यात त्यांच मोठं योगदान होतं. जगजीत सिहं यांनी ५० पेक्षाही जास्त अलबममध्ये गाणं गायलं आहे आणि त्याचं गझलांचं प्रमाण जास्त आहे.
तुमको देखा तो ये खयाल आया, होठों सेछुलो तुम मेरा गीत अमर कर दो, वो कागज कश्ती वो बारिश का पानी यांसारख्या गझल फारच लोकप्रिय होत्या.
5/8
नेल्सन मंडेला यांच्या निधनाननंतर अमूलची श्रद्धांजली
दक्षिण आफ्रिकेच्या रोबेन बेटावर या महानायकाने आयुष्याची 27 वर्षे बंदीवासात काढली. हे बेट म्हणजेच एक तुरुंग होता. आयुष्यातील उमेदीचा काळ त्यांनी वर्णभेदविरोधी लढ्यासाठी घालवला. या लढ्याचे तत्त्वही गांधीवादी होते.म्हणूनच 1990 मध्ये त्यांना भारत सरकारने सर्वोच्च ‘भारतरत्न’ प्रदान केला.
6/8
7/8
अमूलचे जनक वर्गिस कुरियन कालवश झाले तेव्हा...
भारतातील दुग्ध क्रांतीचे जनक आणि अमुल कंपनीचे संस्थापक डॉ . वर्गिस कुरियन यांचे निधन झाले. तेव्हा अमूल बेबीच्या डोळ्यातही पाणी आलं. स्वातंत्र्योत्तर काळात भारतासमोर दूधाचे उत्पादन वाढवण्याचे मोठे आव्हान होते. वर्गिस कुरियन यांच्या प्रयोगात्मक विचारांनी सहकार क्षेत्रात दूध आणि दूग्धजन्य पदार्थांना स्थान मिळाले. गुजरातच्या आणंदमधील गावागावात हे लोण पोहचले आणि दूधाचे उत्पादन मोठ्याप्रमाणावर होऊ लागले.
२६ नोव्हेंबर १९२१ रोजी केरळ येथे कुरियन यांचा जन्म झाला . पण जन्मभूमी केरळ असलेल्या कुरियन यांची कर्मभूमी ठरली ते गुजरातमधील आनंद . सहकार तत्त्वावर दूधाचा व्यवसाय यशस्वीरित्या करता येतो याचा आदर्श कुरियन यांनी घालून दिला .
गुजरात येथे १९७३मध्ये त्यांनी गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनची स्थापना केली. त्यांच्या कारभारामधील पारदर्शकता आणि कामगारांच्या हिताकडे लक्ष देणारे कुरियन यांना ३४ वर्ष अध्यक्षपदावर होते . अकरा हजारांहून अधिक गावे आणि २० लाखांपेक्षा जास्त शेतकरी सदस्य या संस्थेचे सदस्य आहेत. अर्थात यामागे कुरियन यांचा सदस्यांशी आणि कामगारांशी असलेला आपलेपणा ही आहे .
8/8