1/10
2/10
3/10
एलईडी दिवे
हल्ली विजेवर चालू बंद होणाऱ्या दिव्यांच्या माळांची सजावट हे वाळीचं महत्वाचं आकर्षण बनलंय. दाराभोवती, सज्जामध्ये एलईडी दिव्यांच्या माळा संध्याकाळी आकाशातल्या ताऱ्यांप्रमाणे लुकलुकतात. असावेळी काशातले तारेच जमिनीवक उतरून आल्याचा भास होतो. या दिव्यांच्या माळा फारशा महागही नसतात.त्यामुळे सजावटीसाठी घरात अशा माळा वापरायला काहीच हरकत नाही.
4/10
फुलं
मंगल प्रसंगी फुलांचा सहवास हा भारतीय परंपरेत महत्वाचा मानला जातो. रंगबेगंरी सुंदर कोमल फुलं, त्यांचा सुगंध असं रंग,रुप, स्पर्शाने आनंद देणाऱ्या फुलांना उत्सवांमध्ये नेहमीच मानाचं स्थान देण्यात येतं. दिवाळीतही घरात फुसलांची आरास करून सजावट करता येते. वेगवेगळ्या रंगाची फुलं वापरून नक्षी तयार केली जाते. या फुलांच्या सुगंधाने घरातलं वातावरण पवित्र होतं.
5/10
वॉल हँगिंग
सजावटीमध्ये भिंतीवर कलाकुसर असणाऱ्या वस्तूंचं प्रदर्शन दिवाळीच्या सणाला अधिक आकर्षक बनवतं. भिंतीवर वेगवेगळ्या वस्तू टांगण्याची पद्धत आपल्याकडे फारशी प्रचलित नाही. पण, हळूहळू या गोष्टीचं प्रमाणही वाढू लागलंय. हल्ली वेगवेगळ्या, सुंदर वस्तू बाजारात उपलब्द असतात. या वस्तू भिंतीवर लावून घर अधिक आकर्षक बनवता येतं.
6/10
रांगोळी
गेरूने सारवलेल्या जमिनीवर रंगीबेरंगी सुंदर रांगोळी काढणं हे आणखी एक दिवाळीचं वैशिष्ट्य. सकाळी उंबरठ्यावर आणि दाराशी रांगोळी काढल्याने भरभराट होते, असं मानलं जातं. दिवाळी रांगोळी काढून आपण लक्ष्मीला आमंत्रित करत असतो. रांगोळी सौभाग्य प्रदान करते. रांगोळीच्या मधोमध दिवा लावून रांगोळीची शोभा वाढवली जाते.
7/10
आकाश कंदिल
कागदापासून बनवलेले आकाशकंदिल हे दिवाळीचं खास वैशिष्ट्य. आकाश कंदिल फारसे महाग नसतात. आणि घरात संध्याकाळच्यावेळी आकाशकंदिल लावला. की घराला शोभा येते. हल्ली चायनिज पद्धतीचे आकाशकंदिल मिळू लागले आहेत. वेगवेगळ्या आकाराचे, डिझाइन्सचे आकाश कंदिल उपलब्ध असतात. पण खरी शोभा पारंपरिक आकाश कंदिलांमुळेच येते.
8/10
9/10