सैफीना

Oct 15, 2012, 15:47 PM IST
1/9

लग्न ठरलंअखेर अनेक अफवांनंतर सैफची आई शर्मिला टागोर हिने सैफ-करीना विवाहाच्या तारखेची घोषणा केली. १६ ऑक्टोबर २०१२ रोजी त्यांचा विवाह होणार असल्याचं शर्मिला टागोर यांनी स्पष्ट केलं.

लग्न ठरलं
अखेर अनेक अफवांनंतर सैफची आई शर्मिला टागोर हिने सैफ-करीना विवाहाच्या तारखेची घोषणा केली. १६ ऑक्टोबर २०१२ रोजी त्यांचा विवाह होणार असल्याचं शर्मिला टागोर यांनी स्पष्ट केलं.

2/9

करीनाचा होकार१६ मार्च २०१२ रोजी एका मीडिया कॉन्क्लेव्हमध्ये कीनाने प्रथमच सैफसोबत लग्न करणार असल्याची बातमी सांगितली. ती लग्न कधी करणार आहे, याविषयी वेगवेगळे अंदाज बांधले जाऊ लागले. नंतर बऱ्याचवेळा त्यांच्या लग्नाच्या तारखेबद्दल अफवा उठत राहिल्या. मात्र त्या खोट्याच ठरल्या.

करीनाचा होकार
१६ मार्च २०१२ रोजी एका मीडिया कॉन्क्लेव्हमध्ये कीनाने प्रथमच सैफसोबत लग्न करणार असल्याची बातमी सांगितली. ती लग्न कधी करणार आहे, याविषयी वेगवेगळे अंदाज बांधले जाऊ लागले. नंतर बऱ्याचवेळा त्यांच्या लग्नाच्या तारखेबद्दल अफवा उठत राहिल्या. मात्र त्या खोट्याच ठरल्या.

3/9

लग्नाची मागणीतोपर्यंत सैफ आणि करीना एकमेकांसोबत फक्त डेटिंग करत होते. २००९मध्ये मात्र सैफ खानने प्रथमच करीनासोबत लग्नाची इच्छा व्यक्त केली आणि तिला रीतसर लग्नाची मागणी घातली.

लग्नाची मागणी
तोपर्यंत सैफ आणि करीना एकमेकांसोबत फक्त डेटिंग करत होते. २००९मध्ये मात्र सैफ खानने प्रथमच करीनासोबत लग्नाची इच्छा व्यक्त केली आणि तिला रीतसर लग्नाची मागणी घातली.

4/9

सैफीनाऑक्टोबर २००७मध्ये मनीष मल्होत्राच्या एका फॅशन शोमध्ये सैफ आणि करीना यांनी आपल्यातील प्रेमाची जगासमोर कबुली दिली. त्या दिवसापासून सैफ- करीना यांच्या जोडीला मीडियाने एकत्रितपणे ‘सैफीना’ हे नव बहाल केलं.

सैफीना
ऑक्टोबर २००७मध्ये मनीष मल्होत्राच्या एका फॅशन शोमध्ये सैफ आणि करीना यांनी आपल्यातील प्रेमाची जगासमोर कबुली दिली. त्या दिवसापासून सैफ- करीना यांच्या जोडीला मीडियाने एकत्रितपणे ‘सैफीना’ हे नव बहाल केलं.

5/9

विवाह बंधनातगेल्या पाच वर्षांत सैफ आणि करीना यांच्यातील नातं अधिकाधिक दृढ होत असल्याचं सर्वांनाच जाणवत होतं. लग्नाचा दिवस अखेर जवळ आला असून १६ ऑक्टोबर २०१२ रोजी दोघांचा विवाह होणार आहे. करीना काही दिवसांपूर्वीच म्हणाली होती, “आज आमच्यात घनिष्ट मैत्री आहे. लग्न केवळ एक औपचारिक विधी बनून आमच्यातील नात्याला पूर्णत्व देईल, अशी आशा करते.”

विवाह बंधनात
गेल्या पाच वर्षांत सैफ आणि करीना यांच्यातील नातं अधिकाधिक दृढ होत असल्याचं सर्वांनाच जाणवत होतं. लग्नाचा दिवस अखेर जवळ आला असून १६ ऑक्टोबर २०१२ रोजी दोघांचा विवाह होणार आहे. करीना काही दिवसांपूर्वीच म्हणाली होती, “आज आमच्यात घनिष्ट मैत्री आहे. लग्न केवळ एक औपचारिक विधी बनून आमच्यातील नात्याला पूर्णत्व देईल, अशी आशा करते.”

6/9

जुनं प्रेम प्रकरणत्यावेळी शाहिद कपूरशी प्रेम प्रकरण असलेल्या करीनाचा शाहिदशी ब्रेक-अप झाला होता. या काडीमोडाचा करीनाच्या वैयक्तिक आयुष्यावर खोलवर परिणाम झाला होता. तिचं औदासिन्य घालवण्याचं काम सैफ अली खानच्या रूपाने झालं.

जुनं प्रेम प्रकरण
त्यावेळी शाहिद कपूरशी प्रेम प्रकरण असलेल्या करीनाचा शाहिदशी ब्रेक-अप झाला होता. या काडीमोडाचा करीनाच्या वैयक्तिक आयुष्यावर खोलवर परिणाम झाला होता. तिचं औदासिन्य घालवण्याचं काम सैफ अली खानच्या रूपाने झालं.

7/9

प्रेम बहरलंजेव्हा सैफ-करीना या जोडीचा टशन हा तिसरा सिनेमा आला, तेव्हा  नशीब नक्कीच हसलं असेल. या सिनेमाच्या शुटिंगदरम्यान दोघांची चांगलीच गट्टी जमली. आणि सिनेमाचं शूट संपेपर्यंत दोघांमध्ये एकमेकांबद्दल प्रेम निर्माण झालं... आणि बहरलं.

प्रेम बहरलं
जेव्हा सैफ-करीना या जोडीचा टशन हा तिसरा सिनेमा आला, तेव्हा नशीब नक्कीच हसलं असेल. या सिनेमाच्या शुटिंगदरम्यान दोघांची चांगलीच गट्टी जमली. आणि सिनेमाचं शूट संपेपर्यंत दोघांमध्ये एकमेकांबद्दल प्रेम निर्माण झालं... आणि बहरलं.

8/9

‘सैफ खूप गोड आहे’२००६ साली करीना आणि सैफ विशाल भारद्वाजच्या ओमकारा सिनेमात एकत्र होते. या सिनेमात त्यांची एकमेकांसोबत जोडी नव्हती. त्यामुळे त्याही सिनेमाच्या सेटवर दोघांमध्ये फारसं एकमेकांशी बोलण्याचे प्रसंग आले नाहीत. पडद्यावर तर त्यांचा एकमेकांसोबत एकही सीन नव्हता. मात्र या सिनेमानंतर सैफबद्दल बोलताना करीना म्हणाली होती, “सैफ आपलं अंतर राखून वागतो आणि तो खूप गोड आहे.”

‘सैफ खूप गोड आहे’
२००६ साली करीना आणि सैफ विशाल भारद्वाजच्या ओमकारा सिनेमात एकत्र होते. या सिनेमात त्यांची एकमेकांसोबत जोडी नव्हती. त्यामुळे त्याही सिनेमाच्या सेटवर दोघांमध्ये फारसं एकमेकांशी बोलण्याचे प्रसंग आले नाहीत. पडद्यावर तर त्यांचा एकमेकांसोबत एकही सीन नव्हता. मात्र या सिनेमानंतर सैफबद्दल बोलताना करीना म्हणाली होती, “सैफ आपलं अंतर राखून वागतो आणि तो खूप गोड आहे.”

9/9

‘सैफ परफेक्ट जंटलमन’२००३ साली आलेल्या जे पी दत्ता यांच्या एलओसी कारगील सिनेमात सैफ अली खान आणि करीना कपूर प्रथम जोडीच्या रूपात दिसले होते. पण दोघांचेही एकत्र सीन्स पार कमी होते. त्यामुळे त्यावेळी दोघांमध्ये फारसं बोलणं झालंच नाही. मात्र सैफबद्दल बोलताना करीना म्हणाली होती, की तो एक ‘परफेक्ट जंटलमन’ आहे.

‘सैफ परफेक्ट जंटलमन’
२००३ साली आलेल्या जे पी दत्ता यांच्या एलओसी कारगील सिनेमात सैफ अली खान आणि करीना कपूर प्रथम जोडीच्या रूपात दिसले होते. पण दोघांचेही एकत्र सीन्स पार कमी होते. त्यामुळे त्यावेळी दोघांमध्ये फारसं बोलणं झालंच नाही. मात्र सैफबद्दल बोलताना करीना म्हणाली होती, की तो एक ‘परफेक्ट जंटलमन’ आहे.