1/21
2/21
3/21
4/21
5/21
6/21
7/21
8/21
9/21
10/21
11/21
झाएद खान - मलाईका पारेख
शाळेत असल्यापासून झाएद आणि मलाईकाच्या प्रेमाला सुरूवात झाली होती. हे प्रेमाचं पुढं लग्नातही रुपांतर झालं. त्यांच्या लग्नाला आता सहा वर्षांहून अधिक काळ उलटून गेलाय. या दोघांची जान म्हणजे त्यांचा मुलगा... झिदान... मलाईकाचा होकार मिळवण्यासाठी झाएदला बराच वेळ वाट पाहावी लागली पण शेवटी आपल्या प्रेम तिच्यापर्यंत पोहचवण्यासाठी तो यशस्वी झालाच. त्यानंतर जो तिनं त्याचा हात पकडला तो आयुष्यभरासाठीच...
12/21
फरदीन खान - नताशा माधवानी
‘प्यार तो होना ही था’ म्हणत फरदीननं नताशाला चक्क लंडनहून अमेरिकेला जात असताना फ्लाईटमध्येच लग्नाची मागणी घातली. त्यामुळेच आपण त्याला ‘हाईट’ ऑफ लव्ह... नक्कीच म्हणू शकतो. नताशा माधवानी ही फरदीनची बालपणीची मैत्रीण... नताशाचा होकार मिळताच मग काय... लंडनमध्ये ‘हेंम्पेल’ या पाण्यामध्ये उभारलेल्या एक्सक्लुझिव्ह हॉटेलमध्ये या दोघांच्या साखरपुड्याचा भव्य कार्यक्रमही लगेच पार पडला तर लग्नाची त्यापेक्षाही शानदार सोहळा मुंबईतल्या एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये पार पडला. या लग्नसोहळा अनेकांच्या लक्षात राहिला तो या सोहळ्याच्या भव्यता आणि ग्लॅमरमुळेच...
13/21
इरफान खान - सुत्पा सिकंदर
‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’च्या माध्यमातून इरफान आणि सुत्पाच्या प्रेमकहाणीला सुरुवात झाली. या प्रेमाचं रुपांतर लवकरच लग्नातही झाल. आता त्यांच्या लग्नाला एक दशकांहून अधिक काळ होऊन गेलाय पण त्यांच्या नात्यात मात्र अंतर पडलेलं नाही. त्यांची दोन मुलं बाबील आणि अयान यांच्यासाठी ते बेस्ट आई-वडील होण्याचा प्रयत्न करतायत.
14/21
इम्रान खान - अवंतिका मलिक
इम्रान खान तसा सिनेमांतील त्यांच्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे चर्चेत असला तरी त्याची पत्नी मात्र फारशी मीडियासमोर दिसत नाही. मात्र, त्यांच्या एकमेकांबद्दल असलेल्या आदर आणि समजूतदारपणाकडे पाहिल्यानंतर ही जोडी वेगळी असल्याचं जाणवतं. या दोघांच्या नातेसंबंधाला १० वर्षांहूनही अधिक काळ उलटलाय पण या दोघांच्याही म्हणण्यानुसार त्यांना त्यांच्या लग्नानंतरचं आयुष्य खूप सुखावह आणि हवंहवसं वाटतं. अवंतिका याचं श्रेय देते ते इम्रानच्या शांत स्वभावाला...
15/21
आमीर खान आणि किरण राव
सिनेमा हा त्या दोघांचाही जीव... आणि त्यांच्यातील एक दुवा... ‘लगान’ सिनेमाच्या निमित्तानं ही दोघं एकत्र आली आणि त्यांच्या प्रेमाला सुरूवात झाली. वेगवेगळ्या कारणांनी या प्रेमकहानीचीही बरीच चर्चा झाली. या दोघांचा विवाहबंधनात अडकूनही आनंदात राहण्याचा मंत्र अगदी सोपा आहे... प्रेम आणि एकमेकांबद्दल आदर.
16/21
अरबाझ खान आणि मलाईका अरोरा
आपला भाऊ सोहेलप्रमाणे अरबाझला मात्र आपलं प्रेम मिळवण्यासाठी फार झगडावं लागलं नव्हतं... पूर्वीची मुस्लीम असलेल्या मात्र नंतर हिंदू-ख्रिश्चन धर्म स्वीकारणाऱ्या मलाईकाच्या आईनं या दोघांच्या विवाहासाठी एकच अट ठेवली होती... ती म्हणजे, हे लग्न चर्चमध्ये व्हावं... अरबाझनंही कोणतेही आढेवेढे न घेता आपल्या सासूबाईंना खूश केलं. आज इतक्या वर्षांनंतरही या दोघांना एकत्र पाहताना त्यांच्यातील प्रेमाची खात्री पटते.
17/21
सोहेल खान आणि सिमा सचदेव
विचार करा, काय होतं जेव्हा एखादा मुस्लीम मुलगा आणि हिंदू मुलगी प्रेमात एकमेकांना पाहतात, मनापासून एकमेकांना आपलंसं मानतात, एकमेकांच्या प्रेमात पडतात पण... त्यांच्या कुटुंबाकडून मात्र त्यांच्या या निर्णयाला विरोध होतो... तेव्हा ते पळून जाऊन लग्न करतात... असंच काहीसं हिंदी चित्रपटात घडतं ना! सोहल आणि सिमानंही हाच मार्ग स्वीकारला होता. जाती-धर्माच्या बंधनात अडकून आपल्या प्रेमाचा बळी न देण्याचा निर्णय या दोघांनीही घेतला होता. आज इतक्या वर्षांनंतरही एकमेकांचा हात न सोडणाऱ्या या दोघांनी आपला निर्णय होता, हे दाखवून दिलंय.
18/21
सैफ अली खान आणि करीना कपूर
नवाब सैफ अली खान आणि करीना कपूर... यांच्या लग्नानंतर करीना कपूर आपलं नाव बदलणार का, ती आपली सासू शर्मिला टागोरप्रमाणे लग्नानंतर आपला धर्म बदलणार का? ते सैफ अली खान करीनासाठी आपला धर्म बदलणार का? इथपर्यंत सगळ्या चर्चांणा उधाण आलं होतं. पण, या दोघांनीही आपण दोघांपैकी कुणीही लग्नासाठी आपला धर्म बदलणार नसल्याचं जाहीर करून सगळ्यांची तोंडच बंद करून टाकली... ही जोडी आज आपल्या वैवाहिक जीवनात आनंदात आहे.
19/21
शाहरुख खान आणि गौरी छिब्बर
सगळ्या विरोधांना धुडकावून लावण्याची शक्ती प्रेमात आहे... असं म्हणणाऱ्या शाहरुख आणि गौरीची जोडी सगळ्यांनाच परिचित आहे... तसंच त्यांची प्रेमकहानीही... त्यांच्या जोडीकडे पाहिल्यानंतर ‘प्रेमासाठी वाट्टेल ते’ असं अनेकांना म्हणावसं वाटतं. ‘दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे’ असं म्हणत शाहरुख खाननं गौरीच्या घरच्यांना आपलंसं करून घेतलं... आणि हा खान-छिब्बर विवाहसोहळा पार पडला.
20/21
21/21