मिररलेस कॅमेरा - गॅलॅक्सी एनएक्स

Jun 23, 2013, 15:17 PM IST
1/6

कसा दिसतो कॅमेरा?कॅमेऱ्याच्या सर्वात वर एक पॉप - अप फ्लॅश युनिट बसवलं गेलंय. या कॅमेऱ्याच्या पाठीमागे एक ४.८ इंचाची एलसीडी टचस्क्रीन आहे. या कॅमेऱ्यात एक इलेक्ट्रॉनिक एसव्हीजीए व्ह्यूफाईंडर बसवण्यात आलाय ज्यामुळे आपण डायरेक्ट सूर्यप्रकाशातही चांगले फोटो काढू शकतो.

कसा दिसतो कॅमेरा?

कॅमेऱ्याच्या सर्वात वर एक पॉप - अप फ्लॅश युनिट बसवलं गेलंय. या कॅमेऱ्याच्या पाठीमागे एक ४.८ इंचाची एलसीडी टचस्क्रीन आहे. या कॅमेऱ्यात एक इलेक्ट्रॉनिक एसव्हीजीए व्ह्यूफाईंडर बसवण्यात आलाय ज्यामुळे आपण डायरेक्ट सूर्यप्रकाशातही चांगले फोटो काढू शकतो.

2/6

कधी येणार आणि किंमत काय?सॅंमसंगने आतापर्यंत हा गॅलॅक्सी कॅमेरा कधी बाजारात दाखल होईल आणि त्याची किंमत काय आहे हे अजूनपर्यंत काही उघड केलेले नाही. परंतु, जवळपास ८० हजारांत हा कॅमेरा उपलब्ध होऊ शकेल असं सांगितलं जातंय.

कधी येणार आणि किंमत काय?

सॅंमसंगने आतापर्यंत हा गॅलॅक्सी कॅमेरा कधी बाजारात दाखल होईल आणि त्याची किंमत काय आहे हे अजूनपर्यंत काही उघड केलेले नाही. परंतु, जवळपास ८० हजारांत हा कॅमेरा उपलब्ध होऊ शकेल असं सांगितलं जातंय.

3/6

अॅडव्हान्स टॅक्नोलॉजी...कॅमेऱ्यामध्ये २०.३ मेगापिक्सेल मॅक्स आयसो २५६०० च्या एपीएस – सी सेन्सॉर आहे. हा कॅमेरा फोटोसोबतच १०८० p चा एचडी व्हिडीओचेही चित्रण करु शकतो. यात १६ जीबी जागा आहे त्याचबरोबर आपण यात ६४ जीबीचं मायक्रोएसडी कार्डही टाकून याची मेमरी वाढवू शकतो. यात २ जीबी रॅमही उपलब्ध आहे.अॅडवान्स हायब्रिड ऑटोफोकस सिस्टीमही यात उपलब्ध आहे. यात वेगवान कॅमेराही दोन प्रकारात आहे यात १/१६०० हा मोठा शटर स्पीड आहे आणि ८.६ पर सेकंदाच्या वेगाने हा कॅमेरा फोटो चित्रीत करतो.

अॅडव्हान्स टॅक्नोलॉजी...
कॅमेऱ्यामध्ये २०.३ मेगापिक्सेल मॅक्स आयसो २५६०० च्या एपीएस – सी सेन्सॉर आहे. हा कॅमेरा फोटोसोबतच १०८० p चा एचडी व्हिडीओचेही चित्रण करु शकतो. यात १६ जीबी जागा आहे त्याचबरोबर आपण यात ६४ जीबीचं मायक्रोएसडी कार्डही टाकून याची मेमरी वाढवू शकतो. यात २ जीबी रॅमही उपलब्ध आहे.

अॅडवान्स हायब्रिड ऑटोफोकस सिस्टीमही यात उपलब्ध आहे. यात वेगवान कॅमेराही दोन प्रकारात आहे यात १/१६०० हा मोठा शटर स्पीड आहे आणि ८.६ पर सेकंदाच्या वेगाने हा कॅमेरा फोटो चित्रीत करतो.

4/6

अॅन्ड्रॉईड आणि टचस्क्रीनयात टचस्क्रीनची सुविधा असल्यामुळे कॅमेरा हाताळण्यास अतिशय सुलभ होते. यात बटणे दाबण्याचा त्रास कमी होणार आहे१.६ गिगाहर्टझ क्वॉड प्रोसेसरचा ४.२  जेली बीन अॅन्ड्राईड हाच या कॅमेऱ्याचा महत्त्वाचा भाग आहे. गॅलॅक्सी कॅमेऱ्यासारख्या आपण यात गुगल स्टोरचे वेगवेगळे अॅप्स वापरू शकतो. इन्स्टाग्रामचा वापर करायचा का? यात हीपण सुविधा आहे. यात आपण विविध गेम्सही खेळू शकतो.नवीन फोटोग्राफर्ससाठी हा कॅमेरा खरचं फायदेशीर असणार आहे. यातील विविध फीचर्स तुम्हाला चांगल्या फोटोग्राफीसाठी उपयुक्त ठरु शकतात. यात तुम्ही तुमचे फोटो एकत्र करून डिजीटल फोटो बुकही बनवू शकता.

अॅन्ड्रॉईड आणि टचस्क्रीन

यात टचस्क्रीनची सुविधा असल्यामुळे कॅमेरा हाताळण्यास अतिशय सुलभ होते. यात बटणे दाबण्याचा त्रास कमी होणार आहे

१.६ गिगाहर्टझ क्वॉड प्रोसेसरचा ४.२ जेली बीन अॅन्ड्राईड हाच या कॅमेऱ्याचा महत्त्वाचा भाग आहे. गॅलॅक्सी कॅमेऱ्यासारख्या आपण यात गुगल स्टोरचे वेगवेगळे अॅप्स वापरू शकतो. इन्स्टाग्रामचा वापर करायचा का? यात हीपण सुविधा आहे. यात आपण विविध गेम्सही खेळू शकतो.

नवीन फोटोग्राफर्ससाठी हा कॅमेरा खरचं फायदेशीर असणार आहे. यातील विविध फीचर्स तुम्हाला चांगल्या फोटोग्राफीसाठी उपयुक्त ठरु शकतात. यात तुम्ही तुमचे फोटो एकत्र करून डिजीटल फोटो बुकही बनवू शकता.

5/6

`थ्रीजी` आणि `फोरजी`चा वापर...फोटोग्राफीमधील स्मार्ट अविष्कार म्हणजे ‘सॅमसंगचा गॅलॅक्सी एनएक्स’ असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. याआधी ऑगस्टमध्ये सॅमसंगने गॅलॅक्सी कॅमेऱ्याची घोषणा केली होती ज्यात थ्रीजी आणि फोरजी यांचा समावेश आहे. यातील कॉम्पॅक्ट कॅमेरा मात्र लहान म्हणजेच १/२.३ इंचचा सेन्सॉरचा आहे.

`थ्रीजी` आणि `फोरजी`चा वापर...
फोटोग्राफीमधील स्मार्ट अविष्कार म्हणजे ‘सॅमसंगचा गॅलॅक्सी एनएक्स’ असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. याआधी ऑगस्टमध्ये सॅमसंगने गॅलॅक्सी कॅमेऱ्याची घोषणा केली होती ज्यात थ्रीजी आणि फोरजी यांचा समावेश आहे. यातील कॉम्पॅक्ट कॅमेरा मात्र लहान म्हणजेच १/२.३ इंचचा सेन्सॉरचा आहे.

6/6

अॅन्ड्रॉईड सिस्टमचा वापर...सॅमसंगनं नुकतीच एका नव्या ‘गॅलॅक्सी एनएक्स मिररलेस’ कॅमेऱ्याची घोषणा केलीय. ‘अॅन्ड्राईड’ ऑपरेटींग सिस्टमचा वापर या कॅमेऱ्यात मोठ्या खुबीनं केला गेलाय. या कॅमेऱ्याची बातमी एका आठवड्यापूर्वीच वेबवर ‘लीक’ झाली होती. ‘गॅलॅक्सी एनएक्स’ हा जगातील पहिला कॅमेरा आहे ज्यात ‘थ्रीजी’ आणि ‘फोर जी’ची सुविधा देण्यात आलीय.

अॅन्ड्रॉईड सिस्टमचा वापर...
सॅमसंगनं नुकतीच एका नव्या ‘गॅलॅक्सी एनएक्स मिररलेस’ कॅमेऱ्याची घोषणा केलीय. ‘अॅन्ड्राईड’ ऑपरेटींग सिस्टमचा वापर या कॅमेऱ्यात मोठ्या खुबीनं केला गेलाय. या कॅमेऱ्याची बातमी एका आठवड्यापूर्वीच वेबवर ‘लीक’ झाली होती. ‘गॅलॅक्सी एनएक्स’ हा जगातील पहिला कॅमेरा आहे ज्यात ‘थ्रीजी’ आणि ‘फोर जी’ची सुविधा देण्यात आलीय.