1/16
2/16
3/16
4/16
5/16
6/16
7/16
कभी खुशी कभी गम
लग्नानंतर काजोलने राजू चाचा, कुछ खट्टी, कुछ मिठी यांसारख्या सिनेमांत काम केलं. मात्र तिला यश मिळालं नाही. २००१ साली पुन्हा करण जोहरच्या कभी खुशी कभी गम सिनेमात अमिताभ बच्चन, जया बच्चन, हृतिक रोशन, करीना कपूर आणि शाहरुख खान अशी तगडी कास्ट असणाऱ्या सिनेमात दमदार भूमिका केली. या सिनेमातून काजोलने आपण लग्नानंतरही हिट होऊ शकतो, हे दाखवून दिलं.
8/16
विवाह
कुछ कुछ होता है, हम आपके दिल में रहते है या सिनेमांबरोबरच काजोलची दुश्मन सिनेमातील भूमिकाही या काळात गाजली. तिने केलेली दुहेरी भूमिका लोकप्रिय झाली. प्यार तो हाना ही था, गुंडाराज अशा सिनेमांमध्ये अजय देवगणसोबत काम केलेल्या काजोलने करिअरच्या टॉपवर असतानाच अजय देवगणशी लग्न केलं. १९९९ साली काजोल अजय देवगणशी मराठमोळ्या पद्धतीने विवाहबद्ध झाली.
9/16
कुछ कुछ होता है
करण जोहरच्या कुछ कुछ होता है सिनेमाने पुन्हा काजोलला नंबर १ च्या पदावर नेलं. अंजलीची भूमिका करणाऱ्या काजोलने टॉमबॉय छापाची भूमिका करत आपल्या अभिनयातील वेगळेपणा दाखवून दिला. सोबतीला शाहरुख खान आणि राणी मुखर्जी असल्यामुळे या सिनेमातही शाहरुख आणि काजोलची केमिस्ट्री जुळून आली. हा सिनेमा पुन्हा काजोलला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीची पुरस्कार देऊन गेला.
10/16
11/16
सपने
यावेळी काजोलने तामिळ सिनेमात काम करून लोकप्रियता वाढवली. मिनसारा कानावू या तामिळ सिनेमात काजोलने कॉन्व्हेंटमधील मुलीची भूमिका केली होती. प्रभूदेवा आणि अरविंद स्वामी यांच्या सोबत तिने केलेला हा तामिळ सिनेमा हिंदीत सपने या नावाने आला. या सिनेमातील गाणी विलक्षण लोकप्रिय ठरली. ए. आर. रेहमानच्या संगीताची जादू हा सिनेमा हिट करून गेली.
12/16
दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे
१९९५ साली आलेल्या यशराज फिल्म्सच्या दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे सिनेमाने इतिहास रचला. या सिनेमातून काजोल नंबर १ अभिनेत्री बनली. या सिनेमातील तिच्या अभिनयाची तारीफ झाली. शाहरुख खानसोबत तिची जोडी प्रचंड लोकप्रिय झाली. तिच्या भूमिकेबद्दल सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कारही तिला मिळाला. हिंदी सिनेसृष्टीतील अत्यंत गाजलेल्या सिनेमांमध्ये या सिनेमाची गणना होते.
13/16
14/16
गुप्त
१९९० साली जेव्हा इतर अभिनेत्री कचकड्यांच्या बाहुल्या बनून हिरोंसोबत नाच गाणी करण्यापुरत्याच मर्यादित होत्या, त्यावेळी काजोलने गुप्त सिनेमात नकारात्मक भूमिका करून वेगळा पायंडा पाडला. अशा प्रकारे अभिनेत्रीने नकारात्मक भूमिका करण्याची पद्धत या सिनेमानंतर प्रसिद्ध झाली. या सिनेमासाठी काजोलला नकारात्मक भूमिकेसाठी पुरस्कार मिळाला.
15/16
16/16