हॅप्पी बर्थडे रणबीर!

Sep 29, 2012, 15:39 PM IST
1/10

बर्फी!रॉकस्टारच्या भूमिकेतून लोक सावरतात न सावरतात तोच रणबीरने बर्फी सिनेमातून वेगळं व्यक्तिमत्व समोर आणून प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का दिला. एका मुक-बधिर मुलाची भूमिका रणबीरने इतक्या जिवंतपणे साकारली, की त्याला या सिनेमात एकही डायलॉग नसतानाही लोकांना तो आवडून गेला. चार्ली चॅप्लिनच्या पठडीतला अभिनय करून आता रणबीरने पुन्हा एकदा आपल्यातील अभिनयाचा अवाका लोकांना दाखवून दिला.

बर्फी!
रॉकस्टारच्या भूमिकेतून लोक सावरतात न सावरतात तोच रणबीरने बर्फी सिनेमातून वेगळं व्यक्तिमत्व समोर आणून प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का दिला. एका मुक-बधिर मुलाची भूमिका रणबीरने इतक्या जिवंतपणे साकारली, की त्याला या सिनेमात एकही डायलॉग नसतानाही लोकांना तो आवडून गेला. चार्ली चॅप्लिनच्या पठडीतला अभिनय करून आता रणबीरने पुन्हा एकदा आपल्यातील अभिनयाचा अवाका लोकांना दाखवून दिला.

2/10

रॉकस्टारइम्तियाझ अलीच्या रोमँटिक, सांगीतिक नाट्याने 2011 साली खळबळ माजवली. रणबीरने त्याच्या करीअरमधील आत्तापर्यंतच सर्वंत गुंतागुंतीची व्यक्तिरेखा यात साकारली होती. लाडावलेला तरूण, प्रेमात पडलेला तरूण, भिकेला लागलेला  तरूण आणि त्यातून रॉकस्टार बबनून अत्यंत माज करणारा तरूण रणबीरने साकारला. याशिवाय आपल्या प्रेंमाची गुंतागुंतही त्याने जीव तोडून मांडली.जनार्दनचा जॉर्डनपर्यंतचा प्रवास पाहून भल्या भल्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आणि रणबीरला फिल्मफेअरचं सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं पारितोषिक मिळालं.

रॉकस्टार
इम्तियाझ अलीच्या रोमँटिक, सांगीतिक नाट्याने 2011 साली खळबळ माजवली. रणबीरने त्याच्या करीअरमधील आत्तापर्यंतच सर्वंत गुंतागुंतीची व्यक्तिरेखा यात साकारली होती. लाडावलेला तरूण, प्रेमात पडलेला तरूण, भिकेला लागलेला तरूण आणि त्यातून रॉकस्टार बबनून अत्यंत माज करणारा तरूण रणबीरने साकारला. याशिवाय आपल्या प्रेंमाची गुंतागुंतही त्याने जीव तोडून मांडली.जनार्दनचा जॉर्डनपर्यंतचा प्रवास पाहून भल्या भल्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आणि रणबीरला फिल्मफेअरचं सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं पारितोषिक मिळालं.

3/10

अंजाना अंजानीप्रियंका चोप्रा आणि रणबीर कपूर या जोडीचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारसा कमाल करू शकला नाही. या सिनेमाला समीक्षकांनीही फारसं गांभीर्याने घेतलं नाही. स्मृतिभ्रंश झालेल्या रुग्णाची प्रेमकहाणी या सिनेमात रंगवली होती.

अंजाना अंजानी
प्रियंका चोप्रा आणि रणबीर कपूर या जोडीचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारसा कमाल करू शकला नाही. या सिनेमाला समीक्षकांनीही फारसं गांभीर्याने घेतलं नाही. स्मृतिभ्रंश झालेल्या रुग्णाची प्रेमकहाणी या सिनेमात रंगवली होती.

4/10

राजनीतीरणबीरने पहिल्यांदाच मल्टिस्टारर सिनेमात काम केलं. राजनीती या राजकारणावर आधारीत सिनेमात रणबीरने काहीशा नकारात्मक छटा असणाऱ्या राजकारणी व्यक्तीची भूमिका साकारली होती. यात रणबीरने नाना पाटेकर, नसिरुद्दिन शाह, अजय देवगण, अर्जुन रामपाल, मनोज बाजपेयी यांसारख्या मातब्बर कलाकारांसोबत काम केलं. त्यातही रणबीरने आपली छाप पाडली. याबद्दल त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं नामांकन मिळालं होतं.

राजनीती
रणबीरने पहिल्यांदाच मल्टिस्टारर सिनेमात काम केलं. राजनीती या राजकारणावर आधारीत सिनेमात रणबीरने काहीशा नकारात्मक छटा असणाऱ्या राजकारणी व्यक्तीची भूमिका साकारली होती. यात रणबीरने नाना पाटेकर, नसिरुद्दिन शाह, अजय देवगण, अर्जुन रामपाल, मनोज बाजपेयी यांसारख्या मातब्बर कलाकारांसोबत काम केलं. त्यातही रणबीरने आपली छाप पाडली. याबद्दल त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं नामांकन मिळालं होतं.

5/10

अजब प्रेम की गजब कहानीया सिनेमात रणबीरने हिंदी सिनेमांना साजेसा हिरो रंगवला. हिपोइनसोबत रोमांस करणारा.. तिच्यासाठी काहीही करायची तयारी असलेला, धमाल करणारा, विनोदी असा प्रेम आणि त्याच्यासोबत कतरिना कैफची जोडी बघण्यास तरुणांची गर्दी झाली. आणि सिनेमा हिट झाला.

अजब प्रेम की गजब कहानी
या सिनेमात रणबीरने हिंदी सिनेमांना साजेसा हिरो रंगवला. हिपोइनसोबत रोमांस करणारा.. तिच्यासाठी काहीही करायची तयारी असलेला, धमाल करणारा, विनोदी असा प्रेम आणि त्याच्यासोबत कतरिना कैफची जोडी बघण्यास तरुणांची गर्दी झाली. आणि सिनेमा हिट झाला.

6/10

रॉकेट सिंग: सेल्समन ऑफ द इयरयशराज फिल्म्सचा रॉकेट सिंग: सेल्समन ऑफ द इयर या सिनेमाला प्रतिसाद जरी भव्य मिळाला नसला, तरी हा सिनेमा रणबीरच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा होता. या सिनेमात रणबीरने कुठलीही प्रचलित गोष्ट केली नव्हती. नाच गाणी, मारामारी काहीच नव्हतं. अत्यंत सामान्य सरदारजी सेल्समनचं कॅरेक्टर रणबीरने या सिनेमात उत्कृष्टपणे वठवलं. याबद्दल त्याला फिल्मफेअरचं स्रवोत्कृष्ट अभिनेत्याचं समीक्षकांतर्फे बक्षिस देण्यात आलं.

रॉकेट सिंग: सेल्समन ऑफ द इयर
यशराज फिल्म्सचा रॉकेट सिंग: सेल्समन ऑफ द इयर या सिनेमाला प्रतिसाद जरी भव्य मिळाला नसला, तरी हा सिनेमा रणबीरच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा होता. या सिनेमात रणबीरने कुठलीही प्रचलित गोष्ट केली नव्हती. नाच गाणी, मारामारी काहीच नव्हतं. अत्यंत सामान्य सरदारजी सेल्समनचं कॅरेक्टर रणबीरने या सिनेमात उत्कृष्टपणे वठवलं. याबद्दल त्याला फिल्मफेअरचं स्रवोत्कृष्ट अभिनेत्याचं समीक्षकांतर्फे बक्षिस देण्यात आलं.

7/10

वेक अप सिद!करण जोहर दिग्दर्शित कमी बजेटच्या साध्याशा वाटणाऱ्या वेक अप सिद या सिनेमात रणबीरने काम केलं. यात त्याची हिरोइन कोंकणा सेन शर्मा होती. विजोड जोडी आणि त्यांची एकमेकांशी मैत्री यावर असलेल्या सिनेमात रणबीरचं आजच्या तरुणाईचं प्रतिबिंब दाखवणारं सिदचं पात्र लोकांना आवडलं आणि रणबीर पठडीतल्या अभिनेत्यांपेक्षा वेगळ्या प्रकारचा अभिनेता असल्याचं लोकांनी ओळखलं.

वेक अप सिद!
करण जोहर दिग्दर्शित कमी बजेटच्या साध्याशा वाटणाऱ्या वेक अप सिद या सिनेमात रणबीरने काम केलं. यात त्याची हिरोइन कोंकणा सेन शर्मा होती. विजोड जोडी आणि त्यांची एकमेकांशी मैत्री यावर असलेल्या सिनेमात रणबीरचं आजच्या तरुणाईचं प्रतिबिंब दाखवणारं सिदचं पात्र लोकांना आवडलं आणि रणबीर पठडीतल्या अभिनेत्यांपेक्षा वेगळ्या प्रकारचा अभिनेता असल्याचं लोकांनी ओळखलं.

8/10

बचना ए हसीनोंदुसरीच फिल्म यशराज बॅनरची आणि त्यातही रणबीर सोबत कुठलाही मोठा अभिनेता नव्हता. होत्या त्या तीन हॉट अभिनेत्री. मिनिषा लांबा, बिपाशा बासू आणि दीपिका पदूकोणसोबत त्याचा रोमांस लोकांना आवडला. यातील रणबीरची प्ले-बॉय इमेज आणि नंतर माफी मागण्यासाठी मुलींसाठी वाट्टेल ते करण्याची तयारी असलेला तरूण अशी भूमि का साकारल्यामुळे मुलींमध्ये रणबीरचं फॅन फॉलोइंग वाढलं

बचना ए हसीनों
दुसरीच फिल्म यशराज बॅनरची आणि त्यातही रणबीर सोबत कुठलाही मोठा अभिनेता नव्हता. होत्या त्या तीन हॉट अभिनेत्री. मिनिषा लांबा, बिपाशा बासू आणि दीपिका पदूकोणसोबत त्याचा रोमांस लोकांना आवडला. यातील रणबीरची प्ले-बॉय इमेज आणि नंतर माफी मागण्यासाठी मुलींसाठी वाट्टेल ते करण्याची तयारी असलेला तरूण अशी भूमि का साकारल्यामुळे मुलींमध्ये रणबीरचं फॅन फॉलोइंग वाढलं

9/10

सावरियाँरणबीरने सिनेमात येण्यापूर्वी संजय लीला भन्सालींकडे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं. ब्लॅक सिनेमाच्या दिग्दर्शनाचा एक भाग बनल्यावर अनिल कपूरची कन्या सोनम कपूर हिच्यासह तो भन्सालींच्याच पुढील सिनेमात लोकांसमोर आला. सावरियाँ सिनेमाची कथा दोस्तोव्हस्कीच्या व्हाइट नाइट्सवर आधारीत होती. यातील रणबीर कपूरच्या टॉवेल सोडून पार्श्वभाग दाखवण्याच्या सीनमुळे तो अतोनात गाजला. सिनेमा फ्लॉप झाला. पण रणबीरला सर्वोत्कृष्ट पदार्पणाचं बक्षिस मिळालं.

सावरियाँ
रणबीरने सिनेमात येण्यापूर्वी संजय लीला भन्सालींकडे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं. ब्लॅक सिनेमाच्या दिग्दर्शनाचा एक भाग बनल्यावर अनिल कपूरची कन्या सोनम कपूर हिच्यासह तो भन्सालींच्याच पुढील सिनेमात लोकांसमोर आला. सावरियाँ सिनेमाची कथा दोस्तोव्हस्कीच्या व्हाइट नाइट्सवर आधारीत होती. यातील रणबीर कपूरच्या टॉवेल सोडून पार्श्वभाग दाखवण्याच्या सीनमुळे तो अतोनात गाजला. सिनेमा फ्लॉप झाला. पण रणबीरला सर्वोत्कृष्ट पदार्पणाचं बक्षिस मिळालं.

10/10

रणबीर झाला ३० वर्षांचाबॉलिवूडचं पहिलं कुटुंब मानलं जाणाऱ्या कपूर कुटुंबातून आणखी एक मुलगा मोठ्या पडद्यावर अवतरला. आणि पाहाता- पाहाता त्याने आपलं स्वतःचं स्थान निर्माण केलं. सौंदर्य आणि अभिनय यांची देणगी तर त्याला उपजतच मिळाली होती. मात्र त्याचा योग्य वापर करत आपल्या रोमँटिक लूकवरच अवलंबून न राहाता रणबीर कपूरने आपलं नाणं खणखणीत वाजवलं. त्याने निवडलेले सिनेमे त्याच्या यशाचं प्रमुख रहस्य ठरलं. आज रणबीर 30 वर्षांचा झाला आहे

रणबीर झाला ३० वर्षांचा
बॉलिवूडचं पहिलं कुटुंब मानलं जाणाऱ्या कपूर कुटुंबातून आणखी एक मुलगा मोठ्या पडद्यावर अवतरला. आणि पाहाता- पाहाता त्याने आपलं स्वतःचं स्थान निर्माण केलं. सौंदर्य आणि अभिनय यांची देणगी तर त्याला उपजतच मिळाली होती. मात्र त्याचा योग्य वापर करत आपल्या रोमँटिक लूकवरच अवलंबून न राहाता रणबीर कपूरने आपलं नाणं खणखणीत वाजवलं. त्याने निवडलेले सिनेमे त्याच्या यशाचं प्रमुख रहस्य ठरलं. आज रणबीर 30 वर्षांचा झाला आहे