मुंबई : मीन राशीच्या व्यक्तींसाठी २०१९ हे नवीन वर्ष हे लकी ठरणार आहे. या राशीचा स्वामी बृहस्पती आहे जे या राशीच्या भाग्यस्थानी विराजमान आहेत. ऐवढंच नाही तर भाग्यात गुरु सोबत बुधचं असणं देखील या राशीच्या व्यक्तींना यशाकडे घेऊन जाईल. मुलांच्या कल्पानांकडे दुर्लक्ष करु नका. त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो. मीन राशीमध्ये सध्या मंगळ विराजमान आहे. ज्यामुळे या वर्षी लग्नाचा योग देखील बनत आहे.
राशी फळ : नवीन वर्ष या राशीसाठी लाभदायक ठरेल. धर्म आणि पुण्य-कर्मामुळे शांती मिळेल. जूननंतर विवाह किंवा तीर्थ यावर खर्च होऊ शकतो. आर्थिक, शारीरिक, कौटुंबिक समस्या होऊ शकते. त्यावर निंयत्रण ठेवण्याची गरज. डिसेंबर महिना शुभ ठरु शकतो.
करिअर : या राशीच्या व्यक्तींना मोठं यश मिळू शकतं. सुरुवातीचे महिने या राशीसाठी लाभदायक आहेत. पदोन्नतीचा आणि नवीन नोकरी मिळण्याचा योग आहे. विरोधकांना आपल्या कौशल्याने जिंकू शकता.
कौटुंबिक जीवन : तुमच्या पत्नीसोबत चांगला वेळ घालवू शकता. तुमच्या मुलांना देखील सुख मिळू शकतं. प्रेम संबंधात पुढे जाता येईल. अनेक नवीन मित्र बनतील.
आर्थिक स्थिती : संपूर्ण वर्षात तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. जूनमध्ये विवाह आणि तीर्थयात्रेवर खर्च होऊ शकतो. वेळ आणि ऊर्जा वाया घालवू नका. कर्ज यावर्षी फेडण्याची संधी.
आरोग्य : आरोग्य विषयी समस्यांकडे दुर्लक्ष करु नका. ब्लड प्रेशर आणि पोटाच्या संबंधित तक्रारींवर लक्ष द्या.
मीन राशीच्या व्यक्तींसाठी हे वर्ष लकी ठरणार आहे. कुटुंबाला वेळ द्याल. गृहस्थ जीवन चांगलं राहिल. समाजात प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल.