मुंबई : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेक जण सज्ज आहेत. कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हे वर्ष कसं असेल आणि काय खास असेल हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
राशी फळ : नवीन वर्ष हे कुंभ राशीसाठी सुख-समृद्धी आणणारं ठरेल. भौतीक सुख, वाहन, घर यासाठी खर्च होऊ शकतो. यावर्षी तुमचा सन्मान आणखी वाढेल. तुमच्या हातून मोठं शुभ कार्य होणार आहे. प्रेम संबंधात यश मिळेल. कुंभ राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष चांगलं असेल.
करिअर : कामाच्या ठिकाणी वरिष्ठांच्या सहकार्याने पुढे जाल. नवीन काम सुरु करण्यासाठी योग्य वेळ आहे. कामाच्या निमित्ताने परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. व्यापारात देखील चांगलं यश मिळू शकतं.
कौटुंबिक जीवन : संतान प्राप्तीचा योग आहे. कुटुंबात सुख-शांती असेल. नवीन वर्षात तीर्थ यात्रा करु शकता. मित्र परिवारासोबत नातं आणखी घट्ट होईल आणि त्यांच्यात तुमचा सन्मान वाढेल.
आर्थिक स्थिती : आर्थिक सुखसाठी हे वर्ष चांगलं राहिल. नवीन गाडी घेऊ शकता. वर्षाच्या सुरुवातीला खर्च वाढू शकतो. अडकून पडलेला पैसा परत मिळू शकतो.
आरोग्य : आरोग्यासाठी नवीन वर्ष लाभदायक ठरेल. दुर्लक्ष केल्यास काही समस्या वाढू शकता. त्यामुळे शरिराची काळजी घ्या.
कुंभ राशीच्य़ा व्यक्तींना नोकरी आणि व्यापार दोन्ही क्षेत्रात यश मिळू शकतं. काही खास गोष्टी मिळवू शकता. यावर्षी तुम्ही खूप मेहनत कराल. त्याचा फायदा देखील तुम्हाला होईल. तुमच्या कामाजी दखल घेतली जाईल आणि तुमचं प्रमोशन होईल. कुंभ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली राहिल.