Vishwakarma Jayanti: हिंदू पुराणांनुसार विश्वकर्मा हे जगातील पहिले वास्तुकला तज्ज्ञ आहेत. सृष्टीचा सृजनकर्ता म्हणून विश्वकर्मा यांना पाहिले जाते. ते देवतांचे वास्तु शिल्पकार म्हणूनही पूजले जातात. हिंदू धर्मानुसार, महादेवांचे त्रिशूळ, विष्णुचे सुदर्शन चक्र यासारखे देवी-देवतांचे अस्त्र-शस्त्र त्याचबरोबर सोन्याची लंका, द्वारकेतील भगवान श्री कृष्णांचा महाल, इंद्रदेवांचा स्वर्गलोक यासारख्या अनेक भवन उभारले. विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी अनेक जण घर, कार्यालय, फॅक्टरीयासरख्या मशीन यांची पूजा करतात.
महाराष्ट्र, गुजरात, राजस्थानमध्ये माघ महिन्याच्या त्रयोदशीला विश्वकर्मा जयंती साजरी करण्यात येचे. यंदा 22 फेब्रुवारी 2024 रोजी विश्वकर्मा जयंती साजरी करण्यात येणार आहे. या निमित्ताने जाणून घेऊया जयंतीचे महत्त्व, पूजा, मुहूर्त यासगळ्याची माहिती जाणून घेऊया.
हिंदू धर्मानुसार विश्वकर्मा जयंती खूप महत्त्वाची मानली जाते. यादिवशी भगवान विश्वकर्मा यांची पूजा-अर्चना केली जाते. भगवान विश्वकर्मा यांच्या जयंतीच्या दिवशी होणाऱ्या पूजेत लोहार, मजूर, इंजिनीअर, वास्तुकार, मूर्तीकार इतकंच नव्हे तर फॅक्टरीमध्ये काम करणारे मजूर व कारखान्यातील मालकदेखील सहभागी होतात. विश्वकर्मा जयंती प्रथ्येक वर्षी फेब्रुवारी महिन्यात भारतातील उत्तर-पश्चिम भागात साजरी केली जाते. या सणानिमित्त विविध प्रकारच्या सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. भगवान विश्वकर्मा यांची विधीवत पूजा केल्याने व्यवसायात लाभ होताच तसंच, कर्मचाऱ्यासाठी दुर्घटना मुक्त वातावरण तयार होतं, अशी मान्यता आहे.
माघ शुल्क पक्ष त्रयोदशी प्रारंभ 11.28 (21 फेब्रुवारी 2024, बुधवार)
माघ शुल्क पक्ष त्रयोदशी समाप्त 01.22 (22 फेब्रुवारी 2024, गुरुवार)
उदया तिथीनुसार 22 फेब्रुवारी 2024 गुरुवारी भगवान विश्वकर्मा यांची पूजा केली जाईल.
माघ शुल्क पक्षातील त्रयोदशीच्या दिवशी सूर्योदयाआधी ब्राह्म मुहूर्तावर स्नान करुन स्वच्छ वस्त्र परिधान करावे. त्यानंतर फॅक्टरी किंवा घरी जिथे पूजा करावी आहे. त्या स्थानाची साफ-सफाई करा. गंगेच्या पाण्याने ती जागा शुद्ध करा. रांगोळी किंवा फुलांनी ती जागा छान सजवा. पूजेच्या ठिकाणी विश्वकर्मा यांची मूर्ती स्थापन करा. धूप-दिवा प्रज्वलीत करुन भगवान विश्वकर्मा आव्हान मंत्र 'ॐ आधार शक्तपे नम:, ॐ कूमयि नम:, ॐ अनन्तम नम:' म्हणा.
आता भगवान विश्वकर्मा यांना चंदन, फुल अर्पण करा. विश्वकर्मा यांना मिठाईचा नैवेद्य दाखवून आरती करुन घ्या. तसंच, तुमच्या दैनंदिन कामात लागणारे अवजारे, मशीन यांचीही पूजा करा. त्यानंतर सर्व मजुरांना प्रसाज देऊन त्यांचा सन्मान करा.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )