Shubh Yog In Navratri : यंदा दसरा दिवाळीला खऱ्या अर्थाने लक्ष्मीचं स्वागत होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार नवरात्रीत तब्बल 400 वर्षांनंतर 9 दुर्मिळ तयार झाले आहेत. 15 ऑक्टोबरला पद्म आणि बुधादित्य योग होता. 16 ऑक्टोबरला स्वाती नक्षत्र आणि भद्रा तिथीचा छत्रयोग आहे. 17 ऑक्टोबरला प्रीती, आयुष्मान आणि श्रीवत्स योग होता. 18 ऑक्टोबरला सर्वार्थ सिद्धी योग आणि अमृत सिद्धी होता. 19 ऑक्टोबरला बुध गोचरमुळे तूळ राशीत चर्तुग्रही योग तर 20 ऑक्टोबरला षष्ठीतिथी आणि मूल नक्षत्राचा रवि योग आहे. 21 ऑक्टोबरला त्रिपुष्कर योग तर 22 ऑक्टोबरला सर्वार्थ सिद्धी योग आणि रवि योग आणि 23 ऑक्टोबरला सर्वार्थ सिद्धी आणि रवि योग आहे. तर दसऱ्याला अमृतकाल आणि वृद्धी योग आहे. हे योग तीन राशींच्या लोकांसाठी वरदान ठरणार आहे. (9 rare yogas in Navratri after 400 years Dussehra Diwali will be rich for these zodiac signs)
या 9 दुर्मिळ योगामुळे मेष राशीच्या लोकांना वरदान ठरणार आहे. विवाहित जीवनात आनंद घेऊन येणार आहे. जोडीदारासोबत रोमँटिक क्षण घालविणार आहात. नोकरदार वर्गाला आनंदाची बातमी मिळणार आहे. तुम्हाला कामाचा मोबदला मिळणार असून उच्च पद देण्यात येणार आहे. सामाजिकदृष्ट्याही लोकांमध्ये खूप लोकप्रिय असणार आहे. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला जबरदस्त फायदा होणार आहे. कौटुंबिक बाबींमध्ये हा योग अतिशय शुभ ठरणार आहे. भागीदारीच्या कामातून तुम्हाला यश प्राप्त होईल.
या 9 दुर्मिळ योगामुळे धनु राशीच्या लोकांना भाग्यशाली ठरणार आहे. तुमचे प्रलंबित कामं मार्गी लागणार आहे. हा काळ तुमच्यासाठी सुवर्ण काळ ठरणार आहे. कार्यक्षेत्रात प्रगतीसोबत यशाचे शिखर तुम्ही गाठणार आहात. नवीन गाडी किंवा मालमत्ता खरेदी करणार आहात. अचानक धनलाभ होणार आहे. तर व्यावसायिक मोठ्या करारावर स्वाक्षरी करणार असून भविष्यात त्यातून जबरदस्त फायदा होणार आहे.
या 9 दुर्मिळ योगामुळे मकर राशीच्या लोकांना फायदा होणार आहे. या लोकांच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहे. नवीन कामासाठी हा काळ शुभ असणार आहे. कामाचं बोलायचं झालं तर नोकरी आणि व्यवसायात प्रगती घेऊन आला आहे. तुमच्यावर नवीन जबाबदारी मिळणार आहे. तुम्हाला भरपूर पैसा मिळणार असून तुमचं बँक बलेन्स सुधारणार आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यासाठी हा काळ यश घेऊन आला आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)