Sun Transit 2024 : नशिबाचे दरवाजे उघडण्यासाठी काही तास बाकी! सूर्य महागोचरमुळे 'या' राशी होणार मालामाल

Surya Gochar 2024 : तब्बल 1 वर्षांनंतर सूर्य मकर राशीत महागोचर करणार आहे. त्याचा परिणाम 12 राशींवर दिसून येणार असून त्यातील काही राशींवर सूर्यदेवाची विशेष कृपा बरसणार आहे. या राशींना भरपूर पैसा मिळणार आहे. 

नेहा चौधरी | Updated: Jan 13, 2024, 12:30 PM IST
Sun Transit 2024 : नशिबाचे दरवाजे उघडण्यासाठी काही तास बाकी! सूर्य महागोचरमुळे 'या' राशी होणार मालामाल title=
A few hours left to open the doors of destiny these zodiac sign will have wealth due to Sun transit or surya gochar 2024

Surya Gochar 2024 :वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा राजा सूर्यदेव दर महिन्याला आपली राशी बदलतो. सूर्याचे संक्रमण हे 12 राशीच्या लोकांच्या जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम करतो. वर्षभरानंतर सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतोय. मकर राशी ही शनिची राशी असून सूर्याशी पिता-पुत्राचं नातं असूनही शत्रुत्वाची भावना असल्याचं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. पण मकर राशीत सूर्याचं आगमन शुभ ठरणार आहे. कारण या काळात शनिदेवही खूप प्रसन्न असणार आहे. मकर राशीतील सूर्याचं आगमन प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रभाव पाडणार आहे. पण 3 राशींचे नशिब पालटणार आहे. (A few hours left to open the doors of destiny these zodiac sign will have wealth due to Sun transit or surya gochar 2024)

ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य 15 जानेवारीला पहाटे 2:54 वाजता मकर राशीत गोचर करणार आहे . सूर्य हा आत्म्याचा कारकही मानला जातो. यासोबतच ज्या कुंडलीत सूर्याची स्थिती बलवान असते, त्या कुंडलीत सुख, समृद्धी, मान-समृद्धी वाढणार आहे. 

मेष रास  (Aries Zodiac) 

या राशीचा तो पाचव्या घराचा स्वामी असून तो दहाव्या घरात प्रवेश करणार आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांसाठी सूर्याचं संक्रमण वरदान ठरणार आहे. दशम भावात सूर्य असल्यामुळे या राशीच्या लोकांसाठी उत्पन्नाचं नवे स्रोत उघडणार आहे. यासोबतच अधिक उत्पन्नामुळे बँक बॅलन्सही झपाट्याने वाढणार आहे. कुटुंबात आनंदाचं वातावरण असणार आहे. यासोबतच कामाच्या ठिकाणी वातावरण तुमच्या अनुकूल असणार आहे. ज्यामुळे तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळणार आहे. तुम्हाला सहकारी आणि वरिष्ठांचं पूर्ण सहकार्य लाभणार आहे. ज्यामुळे तुम्ही मोठं यश मिळणार आहे. यासोबतच तुम्ही कुटुंबीय किंवा मित्रांसोबत सहलीला जाणार आहात. 

वृषभ रास (Taurus Zodiac) 

या राशीमध्ये सूर्य नवव्या भावात प्रवेश करणार आहे. तो या राशीच्या चौथ्या घराचा तो स्वामी असल्याने नवव घर भाग्याचा कारक आहे. अशा स्थितीत या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे. दीर्घकाळ प्रलंबित कामं सुख-संपत्तीसह पूर्ण होणार आहेत. व्यवसायाबद्दल बोलायचं झालं तर तुम्हाला मोठा नफा मिळणार आहे. दीर्घकाळ रखडलेल्या प्रकल्पाकडून पुन्हा एकदा अपेक्षा वाढणार आहे. अशा स्थितीत तुम्हाला यशही मिळणार आहे. व्यवसायाच्या क्षेत्रातही तुम्ही भरपूर नफा मिळवणार आहात. नोकरदार लोकांबद्दल बोलायचं झालं तर त्यांचा नवीन नोकरीचा शोध पूर्ण होणार आहे. 

सिंह रास (Leo Zodiac) 

सूर्य हा या राशीचा स्वामी असून तो सहाव्या भावात भ्रमण करणार आहे. अशा स्थितीत या राशीच्या लोकांसाठी केवळ सूर्यासोबत शनिची कृपा बरसणार आहे. नोकरीत बढती मिळणार आहे. यासोबतच अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कामं मार्गी लागणार आहेत. शेअर बाजारातील सट्टेबाजीतून तुम्ही भरपूर पैसे मिळवणार आहात. यासोबतच तुम्ही व्यवसायात पैसे गुंतवून नफा मिळणार आहे. कुटुंबासोबत चांगला वेळ व्यतित करणार आहात. समाजात मान-सन्मान वाढणार आहे. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)