Pradosh Vrat 2023 : आज अधिक मासातील शेवटचं रवी प्रदोष व्रत! शुभ संयोगाने होईल शिवपूजा, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्त्व

Pradosh Vrat 2023 : आज अधिक मासातील दुसरं प्रदोष व्रत आहे. हे व्रत रविवारी आल्यामुळे याला रवी प्रदोष व्रत असं म्हणतात.  

नेहा चौधरी | Updated: Aug 13, 2023, 05:25 AM IST
Pradosh Vrat 2023 : आज अधिक मासातील शेवटचं रवी प्रदोष व्रत! शुभ संयोगाने होईल शिवपूजा, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्त्व title=
adhik maas ravi pradosh vrat 2023 tithi shubh muhurat 2 auspicious yoga astrology news in marathi

Adhik Maas Ravi Pradosh Vrat 2023 : आज अधिक मास कृष्ण पक्षातील दुसरं आणि शेवटचं प्रदोष व्रत आहे. जे व्रत रविवारी येतं त्याला रवि प्रदोष व्रत असं म्हणतात. हा व्रत पाळणाऱ्याला रोगांपासून मुक्तता मिळतं असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे.  अधिक महिन्यातील दोन शुभ मुहूर्तांमध्ये प्रदोष व्रताच्या दुसऱ्या दिवशी भगवान शंकराची पूजा केली जाते.  (adhik maas ravi pradosh vrat 2023 tithi shubh muhurat 2 auspicious yoga astrology news in marathi)

अधिक मास 2023 चं दुसरं प्रदोष व्रत

पंचांगानुसार सकाळी 08.19 वाजता रवी प्रदोष व्रताला सुरुवात होईल. त्रयोदशी तिथी 14 ऑगस्ट सोमवार सकाळी 10.25 वाजेपर्यंत असणार आहे. 

प्रदोष व्रताला 2 शुभ योगायोग

अधिक महिन्यातील दुसरं प्रदोष व्रत शिवपूजनाच्या वेळी, सिद्धी योग आणि पुनर्वसु नक्षत्र शुभ असे योग आहेत. हे दोन्ही शुभ आणि फलदायी मानले जाते. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार पुनर्वसु नक्षत्र हे धन, मान, सन्मान आणि कीर्ती देणारे असून त्याचा अधिपती बृहस्पति आहे. दुसरीकडे, सिद्धी योगात केले कार्य शुभ फळ देतात. आज दुपारी 03.56 पासून सिद्धी योग तयार होत आहे. तर पुनर्वसु नक्षत्र सकाळी 08:26 पासून सुरू होणार आहे.

अधिक महिन्यातील दुसरं प्रदोष व्रत 2023 पूजा मुहूर्त

आज रवि प्रदोष व्रताची पूजा संध्याकाळच्या वेळी भगवान शंकराची आराधना करायची आहे. शिवपूजेचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 07.03 ते 09.12 पर्यंत असणार आहे. या दिवशी पूजेसाठी तुम्हाला 2 तासांपेक्षा जास्त वेळ मिळेल, नाशिकचे पंडीत यांनी सांगितलं आहे. प्रदोष व्रताची पूजा नेहमी प्रदोष काळातच करणं शुभ मानली जाते. 

रवी प्रदोष व्रताचं महत्त्व

अधिक मासातील प्रदोष व्रत हे 3 वर्षांनी येतं. या महिन्यात विष्ण आणि शंकर भगवानाची एकत्र पूजा करण्याची संधी मिळते. अधिक महिन्यांचे प्रदोष व्रत ही हरिहर म्हणजेच भगवान विष्णू आणि भगवान भोलेनाथ यांचं आशीर्वाद प्राप्त करण्याची उत्तम संधी मानली जाते. येत्या 16 ऑगस्टला अधिक मासातील अमावस्या आहे. त्यानंतर 17 ऑगस्टला श्रावण महिन्याला सुरुवात होईल. त्यामुळे आजची पूजेची संधी सोडू नका. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x