'या' राशींसाठी कमला एकादशी अतिशय शुभ, भगवान विष्णूच्या कृपेने दूर होतील संकटं

Parama Ekadashi 2023 Horoscope : आज कमला म्हणजे परमा एकदशीचं व्रत आहे. हे व्रत 3 वर्षातून एकदा येतं. आज काही राशींवर भगवान विष्णू विशेष कृपा बरसणार आहे. 

नेहा चौधरी | Updated: Aug 12, 2023, 07:29 AM IST
'या' राशींसाठी कमला एकादशी अतिशय शुभ, भगवान विष्णूच्या कृपेने दूर होतील संकटं title=
parama ekadashi 2023 kamala ekadashi 2023 lucky Horoscope 12 August 2023 lord vishnu shani dev get money

Parama Ekadashi 2023 lucky Horoscope : श्रावण अधिक मास सुरु असून आज कृष्ण पक्षातील एकादशी (#Ekadashi)आहे. कमला एकादशी (kamala ekadashi 2023) म्हणजे परमा, पुरुषोत्तम एकादशी 3 वर्षातून एकदा येते. एकादशीचं व्रत हे भगवान विष्णुला समर्पित आहे. विष्णुदेवाची आराधना केल्यास आयुष्यात सुख, समृद्धी प्राप्त होते. त्यामुळे आज काही राशींवर खूप शुभ (Horoscope 12 August 2023)  ठरणार आहे. यामध्ये तुमची रास आहे का जाणून घ्या. (parama ekadashi 2023 kamala ekadashi 2023 lucky Horoscope 12 August 2023 lord vishnu shani dev get money )

'या' राशींवर बरसणार विष्णुदेवाची कृपा! 

मेष (Aries)

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अतिशय चांगला असणार आहे. तुम्ही उर्जेने परिपूर्ण असल्याने आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साही असणार आहात. धर्म-अध्यात्मात तुमची रुची वाढणार आहे. कुटुंबात नवीन पाहुणे येणार आहेत. व्यापारी वर्गासाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. मोठी करार होणार आहे. या लोकांची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. 

कर्क (Cancer)

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभदायक असणार आहे. गुंतवणुकीतून नफा मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी वेळ उत्तम असणार आहे. आवश्यक सहकार्य मिळाल्याने तुमचं काम पूर्ण होणार आहे. नवविवाहित जोडप्यांमध्ये रोमान्स असणार आहे. तुमच्या जोडीदारासोबत दर्जेदार वेळ घालवणार असल्याने नातं मजबूत होणार आहे. व्यवसायिकाना नवीन संधी मिळणार आहे. 

हेसुद्धा वाचा - ताटापासून मीठापर्यंत चपाती बनवताना 'ही' कामं नक्की करा! घरात नांदेल सुख समृद्धी

धनु (Sagittarius)

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस छान असणार आहे. तुमचं मन प्रसन्न राहणार आहे. जवळच्या व्यक्तीला भेटल्याने तुम्ही प्रसन्न असणार आहात. व्यवसायिकांना नवीन संधी मिळणार आहे. आर्थिक स्थिती चांगली होणार असून तुमच्या आर्थिक समस्या दूर होणार आहे. धार्मिक विधी करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. 

मीन (Pisces)

मीन राशीच्या लोकांसाठी परमा एकादशीचा दिवस खूप शुभदायक असणार आहे. घरात पाहुण्याच्या आगमनाने आनंदाचं वातावरण असणार आहे. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. व्यावसायिकांना व्यवसायाच्या क्षेत्रात नवीन नोकरी किंवा मोठी ऑर्डर मिळणार आहे. याचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे. 

हेसुद्धा वाचा - Kalatmak Yog : 'या' राशींच्या नशिबात 13 ऑगस्टपासून पैसाच पैसा! चंद्र आणि शुक्र युतीमुळे कलात्मक योग

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)