Shukra Gochar August 2022: ज्योतिषशास्त्र म्हटलं ग्रह कोणत्या राशीत कुठे आणि कसे आहेत? यावरून केलेली भाकीतं..त्यामुळे ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या राशी बदलला म्हणजेच गोचराला महत्त्व आहे. नवग्रह मंडळातील नवग्रह ठरावीक कालावधीनंतर राशी बदल करतात. त्यामुळे राशीचक्रातील 12 राशींवर प्रभाव पडतो. काही राशींना शुभ तर काही राशींना अशुभ परिणाम भोगावे लागतात. त्यात गोचर केलेला ग्रह कोणत्या स्थानात आहे याला महत्त्व आहे. कुंडलीतील दुसरं, दहावं आणि अकरावं स्थान महत्त्वाचं ठरतं. या स्थानावर गोचर ग्रहाचा प्रभाव दिसून येतो. आता 24 तासानंतर धन, सुख-सुविधा आणि प्रेमाचा कारक असलेला शुक्र ग्रह सिंह राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे तीन राशींना फायदा होणार आहे.
शुक्र ग्रह 31 ऑगस्टला सिंह राशीत प्रवेश करणार आहे. म्हणजेच सिंह राशीच्या पहिल्या स्थानात प्रवेश करणार आहे.
कर्क: शुक्राच्या राशीतील बदलामुळे कर्क राशीच्या लोकांना खूप फायदा होईल. त्यांना अनपेक्षित पैसे मिळतील. अडकलेले पैसे तुम्हाला मिळतील. भाषणाच्या जोरावर कामे होतील. व्यापाऱ्यांना मोठी ऑर्डर मिळू शकते. हा काळ भरपूर पैसा आणेल.
वृश्चिक: सिंह राशीतील शुक्राचे संक्रमण वृश्चिक राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरेल. करिअरमध्ये मोठे यश मिळू शकते. या काळात प्रगती होण्याची दाट शक्यता आहे. व्यावसायिकांसाठीही हा काळ खूप फायदेशीर आहे. नफा वाढेल, व्यवसायाचा विस्तार होईल. नवीन संपर्क लाभतील. कामात सुधारणा होईल.
तूळ: या राशीच्या लोकांसाठी शुक्राचे संक्रमण शुभ राहील. या लोकांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होईल. करिअरमध्ये तुम्हाला मोठे यश मिळू शकते. विशेषत: जे चित्रपट, माध्यम आणि ग्लॅमर या क्षेत्रांशी निगडीत आहेत, त्यांना खूप फायदा होईल. नवीन नोकरी मिळेल. प्रतिष्ठा आणि पैशाची तुम्ही खूप दिवसांपासून वाट पाहत होता, ते तुम्हाला मिळेल.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)