Amavasya Yog : सूर्य-चंद्राच्या युतीने बनला अमावास्या योग; 'या' राशीच्या व्यक्तींचा कठीण काळ होणार सुरु

Amavasya Yog In Leo: ग्रहांच्या राशी बदलाने अनेक प्रकारचे अशुभ किंवा शुभ योग तयार होतात. नुकतंच 17 ऑगस्ट रोजी सूर्य देवाने गोचर केलं आहे. सूर्याने सिंह राशीत प्रवेश केला असून यामुळे एक अशुभ योग तयार झाला आहे.  

सुरभि जगदीश | Updated: Aug 19, 2023, 09:30 PM IST
Amavasya Yog : सूर्य-चंद्राच्या युतीने बनला अमावास्या योग; 'या' राशीच्या व्यक्तींचा कठीण काळ होणार सुरु title=

Amavasya Yog In Leo: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाची स्थिती ठराविक काळानंतर बदलते. यावेळी ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो. दरम्यान ग्रहांच्या राशी बदलाने अनेक प्रकारचे अशुभ किंवा शुभ योग तयार होतात. नुकतंच 17 ऑगस्ट रोजी सूर्य देवाने गोचर केलं आहे. सूर्याने सिंह राशीत प्रवेश केला असून यामुळे एक अशुभ योग तयार झाला आहे.  

मुळात सिंह राशीत चंद्र आधीच बसला असल्याने सूर्य आणि चंद्राच्या संयोगामुळे अमावस्या योग तयार झाला आहे. अमावस्या योग हा अशुभ योगांपैकी एक मानला जातो. याचं कारण म्हणजे या योगाच्या निर्मितीमुळे चंद्राची स्थिती कमजोर होते. 

ज्योतिषशास्त्रामध्ये चंद्र हा मनाचा करक ग्रह आहे तर सूर्य हा आत्मा आहे. अशा स्थितीत चंद्राच्या कमजोरीमुळे काही राशींच्या व्यक्तीना मानसिक तणावासोबतच आर्थिक आणि शारीरिक समस्यांना अधिक सामोरं जावं लागतं. जाणून घेऊया अमावस्या योगाचा कोणत्या राशींच्या व्यक्तींना वाईट परिणामांना सामोरं जावं लागणार आहे. 

वृश्चिक रास

या राशीमध्ये सूर्य दहाव्या भावात प्रवेश करणार आहे. या काळात तुमच्या स्वाभिमानावर थोडं नियंत्रण ठेवा. कारण त्यामुळे तुमच्यात अहंकार निर्माण होऊ शकतो. कोणत्याही कारणावरून घरामध्ये वाद होऊ शकतात. अशा परिस्थितीत तुमचा अहंकार नियंत्रणात ठेवा, कारण त्याचा तुमच्या व्यावसायिक जीवनावर अधिक परिणाम होऊ शकतो. जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. 

मकर रास

या राशीमध्ये सूर्य आठव्या भावात जात आहे. अशा परिस्थितीत या राशीसाठी अमावस्या योग फारसा शुभ सिद्ध होणार नाही. कोणत्याही व्यक्तीवर आंधळेपणाने विश्वास ठेऊ नका. या राशीच्या लोकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. काही अनपेक्षित घटनांमुळे तुम्हाला मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. अनेक आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. यावेळी गुंतवणुकीतून नुकसान होण्याची शक्यता आहे. 

कुंभ रास

या राशीमध्ये सूर्य सप्तम भावात प्रवेश करत आहे. यासोबतच शनिही या राशीत विराजमान आहे. सूर्य आणि चंद्राच्या संयोगाने तुमचं नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या राशीचे लोक रागावर नियंत्रण ठेवून नको असलेले वादविवाद टाळू शकतात. याचा वैयक्तिक आयुष्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. आर्थिक दृष्टीकोनातून हा काळ थोडा कमजोर असू शकतो. कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या बोलण्यात अडकू नका.

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )