April Gochar 2023: एप्रिल महिन्यात 'विनाशकारी योगा'ची स्थिती; 'या' राशींवर येणार संकटं

ज्योतिष शास्त्राप्रमाणे सूर्य ग्रहांचा राजा देखील मेष राशीत प्रवेश करणार आहे. मात्र राहू त्यापूर्वी त्याठिकाणी आहे. त्यामुळे अशा स्थितीत राहू आणि सूर्याच्या संयोगामुळे ग्रहण योग तयार होणार आहे. 

Updated: Mar 30, 2023, 11:26 PM IST
April Gochar 2023: एप्रिल महिन्यात 'विनाशकारी योगा'ची स्थिती; 'या' राशींवर येणार संकटं

Grah Gochar In April 2023: ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक वेळेवर परिवर्तन करतात. आता एप्रिल महिना सुरू होणार असून एप्रिलमध्ये किती ग्रहांचे संक्रमण होणार आहे याची माहिती घेऊया. एप्रिलमध्ये गुरु आणि शुक्रासह अनेक ग्रह राशी बदलणार आहेत.

या दरम्यान 21 एप्रिलला बुध मेष राशीत प्रवेश करणार आहे, तर 22 एप्रिल रोजी गुरू मेष राशीत प्रवेश करणार आहे. यापूर्वी 14 एप्रिलला सूर्य मेष राशीत प्रवेश करतोय. 

ज्योतिष शास्त्राप्रमाणे सूर्य ग्रहांचा राजा देखील मेष राशीत प्रवेश करणार आहे. मात्र राहू त्यापूर्वी त्याठिकाणी आहे. त्यामुळे अशा स्थितीत राहू आणि सूर्याच्या संयोगामुळे ग्रहण योग तयार होणार आहे. एप्रिलमध्ये या योगांच्या निर्मितीमुळे काही राशींच्या व्यक्तींना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तला तर मग जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत. 

सिंह रास

या राशींच्या व्यक्तींना अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. ज्योतिष शास्त्राप्रमाणे, कामाच्या ठिकाणी काही अनेक समस्यांना सामोरं जावं लागणार आहे. तुम्ही करत असलेल्या बिझनेसमध्ये अडचणी येणार आहेत. इतर व्यक्ती तुमचा गैरफायदा घेण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती कमकुवत राहणार असून गुंतवणूक करणं टाळलं पाहिजे. शक्य असतील ते खर्च टाळावेत. 

वृश्चिक रास

या राशीच्या व्यक्तींनी सावध राहिलं पाहिजे. वैवाहित जीवनात अडचणी येणार असल्याने सतर्क रहावं. व्यावसायिक जीवनात तुम्हाला काही समस्यांना सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. कोणत्याही वादात अजिबात सापडू नका. पैशाचे व्यवहार करणं शक्यतो टाळा.

तूळ रास

या राशीच्या व्यक्तींना सूर्य आणि राहूचा संयोग अडचणी आणू शकतो. या काळात  वैवाहिक जीवनात भांडणं होण्याची शक्यता असून सावधगिरी बाळगणं फायदेशीर ठरेल. नातं तुटणार नाही याची काळजी घ्यावी. याशिवाय या राशीच्या व्यक्तींनी आरोग्याची काळजी घ्यावी. तसंच कुटुंबातील व्यक्तींसोबत काही गोष्टींवरून मतभेद होऊ शकतात.

धनू रास

या योगामुळे धनू राशीच्या व्यक्तींच्या अडचणी वाढणार आहेत. या काळामध्ये आरोग्याची तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे. उत्पन्नाच्या साधनांमध्ये तुम्हाला अडचणी येण्याची शक्यता आहे. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना जास्त मेहनत करावी लागू शकते. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)