April Grah Gochar 2023 : एप्रिल महिन्यामध्ये 'या' 5 राशींचं भाग्य चमकणार, होणार धनलाभ?

April Grah Gochar 2023 in marathi : एप्रिल महिना हा 5 राशींच्या लोकांसाठी खूप भाग्यशाली ठरणार आहे. या महिन्यात गुरू, बुध, शुक्र आणि सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणार आहे. चला जाणून घेऊयात त्या कुठल्या राशीत आहेत ते...   

Updated: Apr 2, 2023, 11:25 AM IST
April Grah Gochar 2023 : एप्रिल महिन्यामध्ये 'या' 5 राशींचं भाग्य चमकणार, होणार धनलाभ?  title=
april Grah Gochar 2023 surya budh shukra guru gochar planet transits 2023 and 5 zodiacs get money astrology news in marathi

April Grah Gochar 2023 Jupiter Transit in 2023 in marathi : अवकाशात ग्रह तारे हे भ्रमती करत असतात, हा एक खगोलशास्त्रीय विषय आहे. पण वैदिक ज्योतिषशास्त्रातही ग्रह ताऱ्यांचा खेळाला विशेष महत्त्व आहे. एप्रिल महिन्याला सुरुवात झाली. हा महिना ग्रह गोचरसाठी खास आहे. कारण या महिन्यात गुरू, बुध, शुक्र आणि सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे हा महिना 5 राशीचं भाग्य फळफळणार आहे. यामध्ये तुमच्या राशीचा समावेश आहे का जाणून घ्या...(april Grah Gochar 2023 surya budh shukra guru gochar planet transits 2023 and 5 zodiacs get money astrology news in marathi)

वृषभ (Taurus)

या राशीसाठी एप्रिल महिना खूप शुभ असणार आहे. सर्व कामे मार्गी लागणार आहेत. आनंदाची बातमी मिळणार आहे. आर्थिकदृष्ट्या हा महिना तुमच्यासाठी भाग्यशाली ठरणार आहे.  व्यवसायाशी संबंधित लोकांनाही फायदा होऊ शकतो. जमीन किंवा मालमत्ता खरेदी-विक्री करूनही तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो.

मिथुन (Gemini)

या राशीच्या लोकांसाठी एप्रिल महिना फलदायी ठरणार आहे. अचानक त्यांना धनलाभ होणार आहे. मात्र त्यांनी या महिन्यात आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. ऑफिसमधील सहकारी आणि वरिष्ठांमध्ये तुमची प्रतिमा चांगली राहील. व्यवसायाशी संबंधितांना या काळात फायदा होण्याची शक्यता आहे. या काळात केलेला प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

कर्क (Cancer)

एप्रिल महिना कर्क राशीच्या लोकांसाठी शुभ आहे. ओळखीच्या व्यक्तीच्या मदतीने महत्त्वाची कामं मार्गी लागणार आहे. कुटुंबात आनंदाचं वातावरण असणार आहे. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी वेळ उत्तम राहील. तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. पण जास्त मेहनत करा. वेळ न घालवता कामावर लक्ष द्या. 

कुंभ (Aquarius)

एप्रिल महिना कुंभ राशीच्या लोकांना खूप दिलासा देणारा ठरणार आहे. जुन्या अडचणी दूर होतील. कामात यश मिळेल. या महिन्यात अवघड कामेही सहज होतील. कामातही सुधारणा होईल. या काळात धार्मिक कार्याकडे तुमचा कल वाढेल. यावेळी कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्या. स्वतःला कायदेशीर अडचणीपासून दूर ठेवा.  

मीन (Pisces)

या राशीसाठी एप्रिल महिना आर्थिकदृष्ट्या चांगला असणार आहे. आनंदाची आणि चांगली बातमी तुम्हाला मिळणार आहे. कामात उत्साह आणि पराक्रम वाढेल. कोणतीही कारवाई करणे किंवा घाईघाईने कोणताही निर्णय घेणे टाळा. नोकरीत तुम्हाला मोठी जबाबदारी मिळू शकते. तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. हा महिना तुम्हाला यश मिळवून देईल.

(Disclaimer : वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)