Astro Tips: डिसेंबर महिन्यात 'हे' उपाय केल्याने माता लक्ष्मीची होईल कृपा...

डिसेंबर महिन्यामध्ये पिंपळाच्या झाडाची पूजा करणं शुभ मानलं जात. असं म्हटलं जात कि, पिंपळ वृक्षात भगवान विष्णू वास करतात

Updated: Dec 4, 2022, 04:49 PM IST
Astro Tips:  डिसेंबर महिन्यात 'हे' उपाय केल्याने माता लक्ष्मीची होईल कृपा... title=

Astro Tips: आपल्याकडे डिसेंबर महिना अत्यंत पवित्र समजला जातो. मार्गशीष महिन्यात माता लक्ष्मीची कृपा व्हावी म्हणून घरोघरी स्त्रिया गुरुवारचं  व्रत करतात. पण तुम्हाला माहिती आहे का काही डिसेंबर महिन्यात असे विशेष उपाय आहेत जे केल्याने तुमच्या कुटुंबातील सर्वांवर देवी लक्ष्मीची कृपा कायम राहते.  (Astro Tips do this upay for luxmi devi blesings you will be wealthy)

हे उपाय केल्यास माता लक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद

सूर्यदेवाला जल अर्पण करा – (gos sun puja)

डिसेंबरमध्ये  गुरुवारी सकाळी सूर्यदेवाला जल अर्पण करा..या नंतर भगवान विष्णूची पूजा करा त्याचसोबत गोरगरिबांना अन्न, कपडे, ब्लॅंकेट, चपला आदी दान करा. असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते. 

पिंपळाच्या ​झाडाची पूजा (pipal tree worship)

डिसेंबर महिन्यामध्ये पिंपळाच्या झाडाची पूजा करणं शुभ मानलं जात. असं म्हटलं जात कि, पिंपळ वृक्षात भगवान विष्णू वास करतात. डिसेंबर मध्ये सकाळी पिंपळाच्या झाडाला पाणी आणि गूळ अर्पण करावा. हे नित्यनेमाने पूर्ण महिनाभर करा,  तुम्ही रोज करू शकत नसाल तर मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी 8 डिसेंबरला हा उपाय आवश्य करा. यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होऊन तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल.

आणखी वाचा: pimple remedy: पिंपल्स एका रात्रीत होतील गायब...नितळ त्वचेसाठी हे उपाय करून पाहाच...

सत्यनारायणाची कथा (satyanarayan katha)

डिसेंबर महिन्यात शेवटच्या पौर्णिमेला भगवान सत्यनारायणाची कथा पठण करा. भगवान नारायण आणि लक्ष्मीला चंदनाचा टिळा अर्पण करून स्वतःही तो लावा. असं केल्यास नशीब तुमच्या साथीला नेहमी असते,डिसेंबर महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी अष्टलक्ष्मी स्तोत्राचा उच्चार करा. यामुळे उत्पन्नाचे नवीन स्रोत खुले होतील आणि प्रगतीचा मार्ग मोकळा होतो. अशाप्रकारे तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल. (Astro Tips do this upay for luxmi devi blesings you will be wealthy)