असं दान कधीही केलं तरी ठरतं लाभदायी, सौभाग्य आणि राजयोगाची चालून येते संधी

सनातन धर्मात दाना करण्याला विशेष महत्त्व आहे. दानाचे अनेक प्रकार आहेत. नियमानुसार असे केल्याने व्यक्तीला अनेक जन्मांचे पुण्य मिळते.

Updated: Dec 22, 2022, 06:46 PM IST
असं दान कधीही केलं तरी ठरतं लाभदायी, सौभाग्य आणि राजयोगाची चालून येते संधी title=

Astrotips : सनातन धर्मात दाना करण्याला विशेष महत्त्व आहे. दानाचे अनेक प्रकार आहेत. आज आपण सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी केल्या जाणाऱ्या दाना विषयी जाणून घेणार आहोत. नियमानुसार असे केल्याने व्यक्तीला अनेक जन्मांचे पुण्य मिळते. तुमच्यावर सूर्याची कृपा लगेच होईल आणि तुम्हाला राजयोगाचे सुख प्राप्त होईल. सूर्याला करण्यात येणाऱ्या या दानामुळे कुंडलीतील अनेक प्रकारचे दोष दूर होतील. तुम्हाला जीवनात कोणत्याही प्रकारच्या अडचणी किंवा समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. चला तर जाणून घेऊया सुर्याला करण्यात येणाऱ्या दानाविषयी आणि त्यामुळे कोणत्या गोष्टी होतात आणि आपले आयुष्य कशा प्रकारे चांगले होते. 

धार्मिक मान्यतेनुसार आदित्य मंडल दानाची पद्धत भगवान श्रीकृष्णांनी युधिष्ठिराला सांगितली होती. या पद्धतीनुसार सगळ्यात आधी ज्वारीत गुळ मिक्स करा आणि त्यानंतर त्यात गाईचं तुप घाला. या मिश्रणात सौर वर्तुळाच्या आकाराचे गोल गोळे बनवला जातो. हे गोळे बनवल्यानंतर सूर्याची पूजा केली जाते. त्यांच्यासमोर लाल चंदनाचा मंडप करण्यात येतो. त्यानंतर बनवलेले सूर्य मंडळ या मंडपावर ठेवण्यात येते.

हेही वाचा : Astro Tips : बुधवारी करा गणपती बाप्पाची आराधना, 'या' उपायांनी सुटेल आर्थिक कोंडी

पूजा झाल्यानंतर ब्राह्मणांना बोलावावे. यानंतर लाल वस्त्र, दक्षिणा आणि ते सूर्यचक्र दान करावे. दान करताना मंत्राचा जप करणे आवश्यक आहे. या पुढील  मंत्राचा उच्चर करत दान केल्याने पुण्य प्राप्त होते.

'आदित्यतेजसोत्पन्नं राजतं विधिनिर्मितम
श्रेयसे मम विप्र त्वं प्रतिगृहेणदमुत्तमम।'' या मंत्राचा उच्चार करा.

जाणून घ्या या दानाचेमहत्त्व

सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी हे दान खूप महत्त्वाचे मानले जाते. या दानाने भगवान सूर्य प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यावर ठेवतात. भगवान सूर्याच्या कृपेने दात्याची सर्व पापे नाहीशी होतात. अशा प्रकारे राजयोग तयार होतो आणि ती व्यक्ती राजासारखी जीवन जगू लागते. तसे, हे दान दररोज केले तर चांगलेच आहे. मात्र विजय सप्तमीच्या दिवशी या दानाचे विशेष महत्त्व मानले जाते. त्यामुळे फक्त सुर्य दान नाही तर कोणत्याही प्रकारचे दान करने हे नेहमीच चांगले मानले जाते. तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल किंवा जेव्हा जमेल तेव्हा गरजूला दान करा. कोणत्याही प्रकारची मदत करताना तुम्हाला पुन्य मिळेल हा विचार करू नका. गरजूला आपल्या मदतीची गरज आहे या प्रकारे दान करा. असे केल्याने नक्कीच तुम्हाला लवकर फळ मिळेल. तुमची परिस्थिती जेवढी आहे तेवढेच दान करा. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)