Astrology 2022: जवळपास महिनाभर सूर्यग्रहणाचा 'या' 4 राशींवर राहू शकतो प्रभाव!

पाहूयात या राशी कोणत्या आहेत.

Updated: Oct 26, 2022, 11:38 PM IST
Astrology 2022: जवळपास महिनाभर सूर्यग्रहणाचा 'या' 4 राशींवर राहू शकतो प्रभाव!  title=

मुंबई : नुकतंच एक ग्रहण पार पडलं. वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण हे तूळ आणि स्वाती नक्षत्रामध्ये होतं. हे अंशत: सूर्यग्रहण भारताच्या काही भागांमध्ये पाहायला मिळालं. हे सूर्यग्रहण ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं होतं. हे खंडग्रास सूर्यग्रहण पुढील महिन्यापर्यंत अनेक राशीच्या व्यक्तींसाठी त्रासदायक ठरू शकतं. पाहूयात या राशी कोणत्या आहेत.

मेष 

या राशीच्या व्यक्तींनी पुढील एक महिना आपल्या वैवाहिक जीवनावर नीट लक्ष देण्याची गरज आहे. या काळात पैशाचा व्यवहार करणं शक्यतो टाळावा. मुख्य म्हणजे स्नानानंतर गुळाचं दान केलं गेलं पाहिजे.

वृषभ 

या काळात वृषभ राशीच्या व्यक्तींनी भांडण तसंच तंट्यापासून दूर रहावं. महिन्याभराच्या काळात कर्जाचा व्यवहार टाळावा. त्याचप्रमाणे पुढील एक महिना स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यावी. 

मिथुन 

मिथुन राशीच्या लोकांनी पुढील 30 दिवस इतरांशी बोलताना भान ठेवावं. याशिवाय या महिन्यात तुम्ही कोणतंही कामात घाई करू नये. येत्या काळामध्ये लांबचा प्रवास टाळावा. जर प्रवास करावाच लागला तर प्रवास करताना विशेष काळजी घ्या. 

सिंह 

सिंह राशीचा प्रभाव ग्रहणानंतरही काही व्यक्तींवर दिसून येतो. ज्योतिष शास्त्रानुसार, सिंह राशीच्या व्यक्तींनी कोणाला काही बोलण्यापूर्वी त्यांच्या बोलण्याचा विचार करावा. या काळात लोकांना छोट्या गोष्टींवर राग येऊ शकतो, त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे.