Budh Gochar 2023 : लवकरच बुध शनीच्या राशीत करणार प्रवेश, 'या' 6 राशी होणार मालामाल

Budh Rashi Parivartan 2023  : बुध हा बुद्धिमत्ता, संवाद, निर्णय आणि गणिताचा जनक मानला जातो. बुध लवकरच मकर राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे 'या' 6 राशींवर पैशांचा पाऊस पडणार आहे. 

Updated: Jan 27, 2023, 07:07 AM IST
Budh Gochar 2023 : लवकरच बुध शनीच्या राशीत करणार प्रवेश, 'या' 6 राशी होणार मालामाल title=
astrology budh gochar 2023 makar rashi parivartan mercury transit on 7 february 2023 luck and money benfits these zodiac signs marathi news

Mercury Transit 2023 :  ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशी प्रवेश करतो तेव्हा तुमच्या भाग्यात बदल होतात, असं ज्योतिषशास्त्रात मानलं जातं. हिंदू धर्मात कुंडली आणि त्यातील ग्रह हे तुमच्या भाग्यावर खूप परिणाम करतात. तुमचं सुख - समृद्धी या ग्रहांवर अवलंबून असते, असं ज्योतिषशास्त्रात मानलं गेलं आहे. त्यामुळे ग्रहांमध्ये बदल होतो तेव्हा राशींनुसार तुमच्यावर परिणाम होतो. ग्रह जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशी प्रवेश करतो याचे परिणाम काही राशींसाठी शुभ तर काही राशींसाठी अशुभ असतात. ज्योतिषशास्त्रात बुध ग्रह हा इतर ग्रहांचा राजकुमार मानला जातो. त्यामुळे हा ग्रह लवकरच एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे याचा परिणाम राशींवर दिसून येणार आहे. 

कधी होणार बुध राशीचं संक्रमण?

ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रह 7 फेब्रुवारीला सकाळी 7.38 वाजता मकर राशीत प्रवेश करणार आहे. त्यानंतर तो 27 फेब्रुवारीपर्यंत मकर राशीत राहणार आहे. यामुळे  6 राशींचं भाग्य उजळणार आहे, त्यांचावर पैशांची बरसात होणार आहे, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. 

'या' राशींवर होणार पैशांची बरसात

मेष (Aries)

मेष राशीच्या लोकांसाठी बुध ग्रह मकर ग्रहात येणं हे खूप शुभ राहणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीच्या दहाव्या घरात बुधचं भ्रमण होईल. या काळात मेष राशींच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायाच्या ठिकाणी शुभ संकेत मिळतील. कुटुंबातही आनंदाचे वातावरण असणार आहे. 

वृषभ (Taurus)

या राशीच्या लोकांसाठी हा काळ आर्थिक प्रगती घेऊन येणार आहे. बुध ग्रह हा वृषभ राशीच्या नवव्या घरात प्रवेश करणार आहे. जर तुमचे पैसे कुठे अडकले असलतील तर या काळात ते तुम्हाला परत मिळणार आहे. कुटुंबात जे काही मतभेद असतील तेही संपतील. जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असला तर हा शुभ काळ आहे. 

कर्क (Cancer)

कर्क राशीच्या सप्तम भावात बुधचं भ्रमण होणार आहे. त्यामुळे कर्क राशीच्या लोकांना व्यवसायात फायदा होईल. शिवाय या काळात भावंडांसोबत चांगला वेळ घालवाल आणि समाजात तुमची कीर्ती वाढेल.

कन्या (Virgo)

कन्या राशीच्या लोकांसाठी बुधाचे संक्रमण शुभ राहील. या राशीच्या पाचव्या घरात बुधचं भ्रमण होईल. तुम्ही तुमच्या मुलांसोबत चांगला वेळ घालवाल. तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला यश मिळेल. शेअर मार्केटमध्ये केलेली गुंतवणूक फलदायी ठरेल. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना फायदा होईल. 

तूळ (Libra)

तूळ राशीच्या लोकांसाठी बुधाचं संक्रमण आनंद घेऊन येणार आहे. या राशीच्या चौथ्या घरात बुधचं भ्रमण होणार आहे. तूळ राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी बॉस तुमच्या कामावर खूश असतील आणि नवीन जबाबदाऱ्या सोपवू शकतात. 

कुंभ (Aquarius)

या राशीच्या 12व्या घरात बुधाचं संक्रमण होणार आहे. कुंभ राशीच्या लोकांसाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील. याशिवाय परदेश प्रवासाचा योग चालू येणार आहे.  मित्र आणि कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात भरभरून यश मिळणार आहे. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)