पाणी जपून वापरा! 15 डिसेंबरपर्यंत मुंबईसह या महत्त्वाच्या शहरांत पाणी कपातीचे संकट

मुंबई उपनगरांमध्ये महानगरपालिकेस होणारा पाणी पुरवठा15 टक्के कपात. नागरिकांचे होणार हाल, कारण काय? 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Dec 14, 2024, 10:05 AM IST
पाणी जपून वापरा! 15 डिसेंबरपर्यंत मुंबईसह या महत्त्वाच्या शहरांत पाणी कपातीचे संकट title=

ऐन हिवाळ्यात मुंबईकरांना पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे. उपनगरांसह ठाणे व भिवंडी महानगरपालिकेस होणाऱ्या पाणीपुरवठ्यात 15 टक्के कपात केल्यामुळे आज आणि रविवारी याचा परिणाम होणार आहे. १४ डिसेंबर २०२४ ते दिनांक १५ डिसेंबर २०२४ पर्यंत मुंबई शहर , उपनगरांसह ठाणे व भिवंडी महानगरपालिकेस होणाऱ्या पाणीपुरवठ्यात १५ टक्के कपात करण्यात आला आहे. 

पिसे विद्युत उपकेंद्रातील मुख्य ट्रान्सफॉर्मर क्रमांक 1 च्या बी फेज करंट ट्रान्सफॉर्मरमध्ये शनिवार , दिनांक 14 डिसेंबर 2024 रोजी रात्री 1 वाजता अचानक बिघाड झाला. त्यामुळे पिसे उदंचन केंद्र येथील एकूण कार्यरत 20पंपांपैकी 6 उदंचन पंप बंद झाले आहेत. सदर दुरुस्तीचे काम युद्धस्तरावर हाती घेण्यात आले आहे. हे दुरुस्ती काम दिनांक 14 डिसेंबर 2024 आणि 15 डिसेंबर 2024४ रोजी सुरु राहणार आहे.

या तातडीच्या दुरुस्ती कामामुळे शनिवार दिनांक 14 डिसेंबर 2024 ते रविवार दिनांक 15 डिसेंबर 2024  या कालावधीत मुंबई शहर आणि उपनगरांसह बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे ठाणे व भिवंडी महानगरपालिकेस होणाऱ्या पाणी पुरवठ्यात 15 टक्के कपात करण्यात येणार आहे. सर्व नागरिकांना विनंती करण्यात येत आहे की , त्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून उपरोक्त नमूद कालावधीत पाणी काटकसरीने व जपून वापरुन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.