Astrology for Sneeze: शुभकार्य करण्याआधी शिंक आल्यास? जाणून घ्या हा शुभशकून की अपशकून

Sneezing Superstition: घरातून कोणतंही शुभकार्य करण्यासाठी निघालात आणि तुम्हाला शिंक आली तर.... ? अनेकांनाच प्रश्न पडतो आता काय करावं? पुढचं पाऊल टाकावं की नाही... पाहा तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं   

Updated: Oct 20, 2022, 07:32 AM IST
Astrology for Sneeze: शुभकार्य करण्याआधी शिंक आल्यास? जाणून घ्या हा शुभशकून की अपशकून title=
Astrology for Sneeze Superstition good or bad

Sneezing Mean Spiritually: शिंक (Sneeze) कोणालाही कधीही येते. कधी सर्दीमुळे, कधी अती थंडीमुळे, कधी प्रदूषणामुळे. शिंक येण्याची कारणं अनेक. पण, तुम्हाला माहितीये का या शिंकण्याशीच शुभशकून (Positive) आणि अपशकुनाचाही (Negative) संबंध आहे. ही नैसर्गिक प्रक्रिया असली तरीही, ज्योतिषविद्येत मात्र त्याविषयी वेगळा दृष्टीकोन मांडण्यात आला आहे. 

शिंक येणं म्हणजे शुभशकून... 
प्राचीन काळापासून शिंक येणं म्हणजे शकून मानला जातो. अनेकजण शिंक आल्यास ओम शांती असं म्हणतात. शिंक येणं म्हणजे प्रेतात्मा नाकातून ये-जा करण्याचं सूचक मानलं जातं. जेव्हा एखादी व्यक्ती कोणत्या कामाची सुरुवात करत असेल आणि त्याच वेळी शिंक आली, तर हे शुभ संकेत मानले जतात. पण, हीच शिंक कोणा दुसऱ्या व्यक्तीला आली तर मात्र वेळ आणि दिशेचा विचार करावा लागतो. 

अधिक वाचा : Dhanteras 2022: धनत्रयोदशीला जुळून येतोय शुभ योग, अशी मिळवा सुख-समृद्धी

शिंकण्याचं महत्त्वं... ( Importance of Sneeze)
शकुनासाठी तीच शिंक महत्त्वाची असते जी अचानक आणि विनाकारण आलेली असेल. तुम्ही एखादं काम करत आहात आणि त्याच वेळी कोणा व्यक्तीला शिंक आली, तर काही क्षण थांबा आणि त्यानंतर शिंका. बाहेर जातेवेळी तुम्हाला शिंक ऐकू आली, तर काही क्षण बसून पाणी पिऊनच अमुक एका ठिकाणी जा. 

शिंकण्याचेही फायदे...(Benefits of Sneeze)
शिंकण्याचा आवाज पहिल्या भागात दक्षिण पूर्व दिशेनं ऐकू आल्यास कामात अडचणी येतात. दुसऱ्यांदाची त्याच दिशेनं आवाज आल्यास हे भीतीचे संकेत असतात. तिसऱ्यांचा असा आवाज आल्यास कोणा मित्राची भेट घडण्याचे संकेत मिळतात. चौथ्यांदा शिंक ऐकून आल्यास हे प्रसन्नतेचे संकेत असतात. 

(ही माहिती सर्वसामान्य संदर्भांवर आधारित असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)