राशीभविष्य | 'या' राशींच्या व्यक्तींना नोकरीत बढती मिळण्याची शक्यता

असा असेल तुमचा आजचा दिवस

Updated: Feb 5, 2021, 07:39 AM IST
राशीभविष्य | 'या' राशींच्या व्यक्तींना नोकरीत बढती मिळण्याची शक्यता

मेष- करिअरच्या दृष्टीने काही महत्त्वाचे निर्णय घेण्यापूर्वी विचार करा. विचारपूर्वक गुंतवणूक करा. कामात चुका होतील. प्रमाणापेक्षा जास्त थकवणारा दिवस असेल. आरोग्याची काळजी घ्या. 

वृषभ-  काही वाद, अडकलेल्या गोष्टी निकाली निघतील. नव्या लोकांना भेटाल. व्यवसायात काहीतरी नव्या गोष्टी कराल. आरोग्याची काळजी घ्या. करिअरच्या दृष्टीने शुभवार्ता कळेल. शत्रूवर मात कराल. जुने वाद मोजडीत काढाल. नोकरी करणाऱ्यांसाठी दिवस चांगला आहे. 

मिथुन- नुकसान होण्याची शक्यता आहे. प्रलोभनांपासून दूर राहा. कुटुंबात आर्थिक स्थितीवरुन मतभेद होऊ शकतात. वाढीव जबाबदारी मिळेल. आरोग्याची काळजी घ्या.

कर्क- नोकरीच्या ठिकाणी वातावरण तुमच्या कलाने नसल्यामुळे चिडचीड होईल. प्रेमप्रकरणांच्या बाबतीत वादांमुळे कोणतेच निर्णय घेऊ नका. ज्या कामांचा बेत आखला आहे, तेसुद्धा पूर्ण होणार नाहीत. वाद आणि इतरांशी स्पर्धा करु नका. 

सिंह- आत्मविश्वास वाढलेला असेल. इतरांना तुमच्या वर्तणूकीतून प्रभावित कराल. विचार करण्याचा तुमचा दृष्टीकोन इतरांच्या पसंतीस येईल. शुभवार्तेच्या प्रतिक्षेत असाल. साथीदाराच्या भावना समजून घ्याल. 

कन्या- कुटुंबाची मदत मिळेल. मानसिक स्थिती सुधारलेली असेल. ज्यामुळे कुटुंबातही आनंदाचं वातावरण असेल. कामं पूर्णत्वास जातील. पैसे आणि कुटुंबाची पूर्ण काळजी घ्या. आरोग्य चांगले राहिल. 

तुळ- मेहनत करा फळ मिळेल. काही इच्छा पूर्ण होतील. बढती मिळण्याची शक्यता आहे. कोणतीही संधी गमावू नका. इतरांकडून तुम्हाला हवी असलेली कामं करुन घेण्यात यशस्वी ठराल. 

वृश्चिक- आर्थिक नुकसान होऊ शकतं. कायदेशीर अडचणींमध्ये अडकू शकाल. वेळेला महत्त्वं द्या. काही गोष्टींसाठी आज अचानकच महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. थोडा थकवा असेल. 

धनु- शेअर मार्केटमध्ये विचारपूर्वक गुंतवणूक करा. वरिष्ठांसोबत नात्यात जरा जपून. करिअरच्या दृष्टीने विचार करणाऱ्यांनाही काही अडचणींचा सामना करावा लागेल. दिवस सर्वसमान्य असेल. 

मकर-व्यापारात फायदा होण्याची चिन्हं. साथीदाराची मदत होईल. त्यांचे सल्ले मदत करतील. अडकलेले पैसे परत मिळतील. आरोग्याची काळजी घ्या. खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष द्या.    

कुंभ- विचारात असलेली कामं पूर्ण होतील. अचानक धनलाभ होऊ शकतो. विचार करण्याचा दृष्टीकोन बदलेल. मित्र आणि भावंडांची मदत मिळेल. साथीदाराकडून प्रेम मिळेल. 

मीन- व्यापाऱ्यांसाठी वेळ चांगला नाही. कोणालाही पैसे उधार देणं टाळा. जुनी देणी अडचणी निर्माण करतील. वाद होण्याची शक्यता आहे. मानसिक ताण वाढेल. खाण्यापिण्याच्या सवयींवर लक्ष ठेवा.