Day Wise Eating: आठवड्यातील वारानुसार 'हे' पदार्थ खाणं टाळा! ग्रहांचे अशुभ परिणाम टळतील

ज्योतिषशास्त्रानुसार, आपली दिनचर्या एखाद्या व्यक्तीच्या ग्रह स्थितीवर परिणाम करते.

Updated: Jul 7, 2022, 04:31 PM IST
Day Wise Eating: आठवड्यातील वारानुसार 'हे' पदार्थ खाणं टाळा! ग्रहांचे अशुभ परिणाम टळतील  title=

Astrology Tips: ज्योतिषशास्त्रानुसार, आपली दिनचर्या एखाद्या व्यक्तीच्या ग्रह स्थितीवर परिणाम करते. त्यामुळे ज्योतिषशास्त्रात सांगितलेल्या सल्ल्यांचं पालन करून आपण ग्रहांच्या अशुभ परिणामांपासून वाचू शकतो. व्यक्तीने दिवसानुसार काही गोष्टींचे सेवन करू नये. यामुळे ग्रहांची स्थिती मजबूत होते.

सोमवार- ज्योतिषशास्त्रानुसार सोमवार हा भगवान शिवासोबत चंद्राचाही दिवस आहे. या दिवशी चंद्राची पूजा केल्याने व्यक्तीच्या कुंडलीत चंद्राची स्थिती चांगली राहते. या दिवशी साखरेचे सेवन करु नये.

मंगळवार- कुंडलीत मंगळाची स्थिती मजबूत ठेवण्यासाठी तुपाचे सेवन करणे अशुभ मानले जाते. मंगळ माणसाला धैर्यवान, पराक्रमी आणि निर्भय बनवतो. त्यामुळे या दिवशी शक्यतो तुपाचा वापर करू नये.

बुधवार - बुधवार हा गणेशाला समर्पित आहे. बुध ग्रह हा वाणी आणि बुद्धीचा कारक मानला जातो. त्यामुळे बुध ग्रहाला बळ देण्यासाठी आणि त्याचे शुभ परिणाम प्राप्त करण्यासाठी हिरव्या भाज्या खाणं या दिवशी टाळा. या दिवशी हिरव्या भाज्या दान केल्याने जीवनात सुख-समृद्धी येते, असे म्हटले जाते.

गुरुवार- हा दिवस भगवान विष्णू आणि बृहस्पती देव यांना समर्पित आहे. या दिवशी केळी दान करणे फार शुभ असते. मात्र या दिवशी केळी आणि दुधाचे सेवन करु नये. केळीच्या झाडात भगवान विष्णू वास करतात असे मानले जाते.

शुक्रवार - शुक्रवार देवी लक्ष्मीला समर्पित आहे. या दिवशी सर्व देवी-देवतांची पूजा करण्याचा नियम असल्याचे सांगितले जाते. अशा स्थितीत उत्तम आरोग्यासाठी आणि कुंडलीतील शुक्र बलवान होण्यासाठी शुक्रवारी आंबट पदार्थांचे सेवन करू नये.

शनिवार - शनिवार हा शनिदेवाला समर्पित आहे. या दिवशी शनिदेवाचा आशीर्वाद घेण्यासाठी मोहरीचे तेल अर्पण केले जाते. ज्योतिष शास्त्रानुसार व्यक्तीने शनिवारी तेलापासून बनवलेल्या वस्तूंचे सेवन करू नये.

रविवार- ज्योतिषशास्त्रानुसार रविवारी सूर्यदोष टाळण्यासाठी आणि कुंडलीत सूर्याची स्थिती मजबूत करण्यासाठी जेवणात मीठ टाळावे. या दिवशी मीठ खाणं टाळल्यास ग्रहाचे शुभ परिणाम दिसून येतात. कुंडलीतील सूर्य व्यक्तीला कीर्ती, सन्मान आणि उत्तम आरोग्य देतो.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)