Astrology Tips: मंदिरात आपण दर्शनासाठी गेलो की चप्पल बाहेर काढून ठेवतो. पण अनेकदा दर्शन घेताना चप्पल चोरीला जाईल, याची भीती असते. त्यामुळे देवाचं दर्शन घेताना चित्त लागत नाही. कधी कधी मंदिराबाहेर आलो की, चप्पल चोरीला गेलेली असते. त्यामुळे निराश होऊन घरी यावं लागतं. मात्र यापुढे मंदिरात जाताना चप्पलची चिंता न करता जा. कारण ज्योतिषशास्त्रानुसार मंदिराबाहेरून चप्पल चोरीला जाणं, शुभ मानलं जातं. जर चप्पल शनिवारी चोरीला गेली तर मग आपल्यावरील पीडा दूर जाते, असं मानलं जातं.
ज्योतिषशास्त्रानुसार शनिवारी मंदिराबाहेर कोणाचे बूट आणि चप्पल चोरीला गेली तर त्याचा अर्थ असा होतो की त्या व्यक्तीची वाईट काळापासून सुटका होणार आहे. त्याचबरोबर व्यक्तीला गरिबीतूनही मुक्ती मिळेल, असे संकेत असतात. शनिवारी मंदिरातून चप्पल गायब होणे शुभ मानले जाते, कारण यामुळे शनिदेवामुळे होणाऱ्या त्रासांपासून मुक्ती मिळते. पायात शनिदेवांचा वास करतो असे मानले जाते. त्यामुळे शनि हा पादत्राणांचा कारक मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार चप्पल दान केल्याने शनिदेवाचा आशीर्वाद मिळतो.
चामडे आणि चप्पल दोन्ही शनिदेवाशी संबंधित आहेत. त्याचवेळी काही लोक शनिवारी मंदिरात शूज आणि चप्पल टाकून जातात. असे मानले जाते की असे केल्याने शनिदेव व्यक्तीचे दुःख कमी करतात.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)