Horoscope : या वर्षातील शेवटचा आठवडा तुमच्यासाठी कसा असणार?

या वर्षातील शेवटचा आठवडा तुमच्यासाठी कसा असणार हे जाणून घ्या. 

Updated: Dec 26, 2021, 07:26 PM IST
Horoscope : या वर्षातील शेवटचा आठवडा तुमच्यासाठी कसा असणार? title=

मुंबई : 2021 हे वर्षही म्हणावं तसं चांगलं गेलं नाही. कोरोना आणि त्याच्या नव्या व्हेरिएंटचं संकट आणि त्यासोबत बेरोजगार अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. येणारं पुढचं वर्ष सुखी समाधानी आणि चांगलं जावं यासाठी प्रार्थना करत आहेत. या वर्षातील शेवटचा आठवडा तुमच्यासाठी कसा असणार हे जाणून घ्या. 

मेष : आपलं आरोग्य चांगलं राहणार आहे. भांडणं होणार नाहीत याची पुरेपूर काळजी घ्या. वाद टाळा आणि शांत राहा. धैर्य सोडू नका, कामाच्या ठिकाणी आपला मुद्दा शांतपणे मांडा. आपल्यासाठी सोमवारचा दिवस चांगला असणार आहे. 

वृषभ : आपल्याला धनलाभ होण्याची शक्यता आहे. करियरसाठी आपल्याला सर्वोत्तम दिवस आहे. प्रवास करताना काळजी घ्या. डोळ्याची विशेष काळजी घ्या. 

मिथुन : वादविवाद टाळा शांत राहण्याचा प्रयत्न करा. आर्थिक स्थिती बरी असणार आहे. तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा. शुक्रवार आपल्यासाठी शुभ असणार आहे. या आठवड्यात आपली खूप धावपळ होण्याची शक्यता आहे. 

कर्क : अडकलेला पैस आपल्याला परत मिळू शकतो. या आठवड्यात तुम्हाला चांगले गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. रविवार आपल्यासाठी शुभ असणार आहे. आरोग्याच्या दृष्टीनं हा आठवडा खूप चांगला असणार आहे. 

सिंह : ह्या आठवड्यात आपण खूप जास्त व्यस्त असणार आहात. आर्थिक खर्च वाढण्याची शक्यता आहे. तणाव कमी होईल. बुधवार आपल्यासाठी शुभ असणार आहे. 

कन्या : करियरमध्ये चांगला फायदा होणार आहे. अडकलेली कामं पूर्ण होणार आहेत. अडकलेले पैसे परत येणार आहेत. सोमवारचा दिवस आपल्यासाठी खूप चांगला असेल. 

तुळ : आठवड्याची सुरुवात आपल्यासाठी फार कठीण असणार आहे. आठवडा संपता संपता समस्या कठीण होणार आहेत. आर्थिक लाभ होईल. बुधवार आपल्यासाठी चांगला असणार आहे. 

वृश्चिक : आपल्याला या आठवड्यात धनलाभ होणार आहे. येणारा पैसा पाण्यासारखा खर्च होणार नाही याची काळजी घ्या. प्रेमात आपल्याला चांगलं यश मिळणार आहे. शुक्रवार आपल्यासाठी चांगला असणार आहे. 

धनु : करियरमध्ये लाभ होण्याची शक्यता आहे. आपल्याला शांत राहण्याची आवश्यकता आहे. पोट आणि हाडांचा त्रास होण्याची शक्यता आहे. रविवारी आपला दिवस खूप चांगला जाणार आहे. 

मकर : करियरमध्ये सुधारणा होऊ शकते. कौटुंबिक वातावरण चांगलं राहील. शुक्रवार आपल्यासाठी चांगला असणार आहे. 

कुंभ : चिंता आणि तणावाचं वातावरण असणार आहे. धनलाभ होईल रविवार आपल्यासाठी खूप चांगला असणार आहे. 

मीन : कौटुंबिक समस्यांवर उत्तर मिळण्याची शक्यता आहे. विवाहाचा योग आहे. करियरमध्ये नव्या संधी मिळतील.