मुंबई : जगातील श्रीमंत आणि उद्योग क्षेत्रातही मोठी कामगिरी करणारी अनेक नावं आपल्यासमोर लगेचच उभी राहतात. या मंडळींनी केलेली कामं पाहता, आपण थक्क होऊन जातो. महागड्या कारपासून राजविलासी राहणीमानापर्यंत यांची प्रत्येक गोष्ट अवाक् करणारी.
बिल गेट्स, एलन मस्क ही त्यापैकीच काही नावं. काहींच्या मते या मंडळींच्या मेहनतीसोबतच नशीबाकडून त्यांना मिळालेली साथही तितकीच महत्त्वाची.
चला तर मग, जाणून घेऊया अशाच मंडळींच्या राशींबद्दल आणि त्यांच्या नशीबाबद्दल.
बिल गेट्स
हल्लीच पत्नी मेलिंडा हिच्याशी घटस्फोट घेत बिल गेट्स प्रकाशझोतात आले होते.
ज्योतीषविद्येनुसार त्यांची रास वृश्चिक (Scorpio)आहे. त्यांच्या संपत्तीचा आकडा आहे तब्बल 137 अब्ज डॉलर.
एलन मस्क
Tesla चे संस्थापक एलन मस्क यांची रास आहे कर्क (Cancer). ते 278 अब्ज डॉलर इतक्या संपत्तीचे मालक आहेत.
जेफ बेजोस
ई-कॉमर्सच्या जगतात अतिशय नामांकित आणि मोठं नाव असणाऱ्या अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांची रास आहे मकर (Capricorn).
बेजोस यांच्या संपत्तीचा आकडा 202 अब्ज डॉलर्सच्या घरात आहे.
मार्क झुकरबर्ग
जगातील सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Facebook चे संस्थापक झुकरबर्ग यांची रास आहे वृषभ.
सूत्रांच्या माहितीनुसार 121 अब्ज डॉलर इतका त्यांच्या संपत्तीचा आकडा आहे.
लॅरी पेज, सर्गी ब्रिन
गुगलची पॅरेंट कंपनी, अल्फाबेटचे संस्थापक लॅरी पेज, सर्गी ब्रिन यांचाही समावेश जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींमध्ये होतो.
त्याच्या संपत्तीचा आकडा अनुक्रमे 131 आणि 126 अब्ज डॉलर इतका आहे.
लॅरी यांची रास मेष (Aries)आणि सर्गी यांची रास सिंह (Leo)आहे.