शिवसेनेला केंद्रात कॅबिनेट देण्यास भाजप तयार, सूत्रांची माहिती

शिवसेनेला केंद्रात कॅबिनेट देण्यास भाजप तयार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. तसेच जुलै मध्ये केंद्र सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार असून शिवसेनेला राज्यसभा उपसभापतीपदही मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

Updated: Jun 5, 2018, 05:43 PM IST
शिवसेनेला केंद्रात कॅबिनेट देण्यास भाजप तयार, सूत्रांची माहिती

मुंबई : शिवसेनेला केंद्रात कॅबिनेट देण्यास भाजप तयार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. तसेच जुलै मध्ये केंद्र सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार असून शिवसेनेला राज्यसभा उपसभापतीपदही मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. दरम्यान, अमित शाह उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट घेऊन चर्चा करणार आहेत.  शिवसेनेने भाजप सोबत लोकसभा लढवावी अशी भाजप नेत्यांची इच्छा आहे. त्यामुळे एनडीएतील मित्र पक्षांची नाराजी कमी करण्याचा भाजपचा प्रयत्न सुरु आहे. यासाठी एनडीए तील घटक पक्षांना विस्तारात स्थान मिळणार असल्याचीही शक्यता आहे. टीडीपी सरकारमधून बाहेर पडल्यामुळे टीडीपीच्या वाट्याचे मंत्रीपद मित्रपक्षांना दिले जाण्याची शक्यता आहे. तर नीतीश कुमार यांच्या जेडीयूला कॅबिनेट मंत्रीपद दिले जाईल अशी माहिती सूत्रांनी दिलीये.