महिलांच्या शरीराच्या 'या' भागांवर केस असणे शुभ, ऐकून तुम्हाला वाटेल आश्चर्य

ज्योतिष आणि समुद्रशास्त्रात त्याचे तपशीलवार वर्णन केले आहे. यानुसार शरीराच्या काही भागांवर केस असणे शुभ मानले जाते.

Updated: Jun 13, 2022, 05:35 PM IST
महिलांच्या शरीराच्या 'या' भागांवर केस असणे शुभ, ऐकून तुम्हाला वाटेल आश्चर्य title=

मुंबई : सामान्यतः पुरुषांच्या शरीरावर स्त्रियांपेक्षा जास्त केस असतात. पुरुषांमध्ये देखील अंगावर केस असण्याची ही संख्या कमी जास्त होत असते. परंतु तुम्हाला माहित आहे का, की ज्योतिष आणि समुद्रशास्त्रात त्याचे तपशीलवार वर्णन केले आहे. यानुसार शरीराच्या काही भागांवर केस असणे शुभ मानले जाते, तर काही ठिकाणी केस असणे अशुभ मानले जाते. बऱ्याचदा महिला सौंदर्यासाठी आपल्या अंगावर असलेले केस वॅक्सिन किंवा क्रिमच्या मदतीने काढतात. परंतु तुम्हाला माहितीय का, की महिलांच्या आंगावर जास्त केस असणे हे शुभ मानले जाते.

हो हे खरं आहे, स्त्रियांच्या हातावर जास्त केस असणे चांगले मानले जाते. अशा महिला खूप भाग्यवान असतात. ते प्रत्येक काम पूर्ण समर्पणाने पूर्ण करते. त्यांच्याकडे नेहमीच भरपूर पैसा असतो.

इतकेच नाही, तर काही महिलांच्या छातीवर देखील केस असतात, हे समुद्रशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रातही शुभ मानले जाते. अशा महिला स्वभावाने खूप समाधानी असतात.

कानातील केस चांगले आहेत की वाईट?

ज्योतिष शास्त्रानुसार कानात केस असणे देखील शुभ असते. अशा लोकांकडे भरपूर पैसा असतो आणि ते आरामदायी जीवन जगतात. या लोकांना खूप कमी कष्टाने सर्व काही मिळते. याशिवाय हे लोक खूप प्रतिभावान असतात आणि त्यांच्यावर देवाची विशेष कृपा असते. त्याच वेळी, पुरुषांच्या छातीवर केस असणे देखील चांगले मानले जाते.