Budh Uday 2023: 10 मे रोजी बुधाचा उदय; 'या' राशींच्या व्यक्तींच्या मागे लागणार संकटं

Budh Uday 2023:  10 मे रोजी बुध ग्रहाचा मेष राशीमध्ये उदय होणार आहे. 

Updated: May 8, 2023, 11:25 PM IST
Budh Uday 2023: 10 मे रोजी बुधाचा उदय; 'या' राशींच्या व्यक्तींच्या मागे लागणार संकटं title=

Budh Uday 2023: ज्योतिष जगामध्ये ग्रहांच्या राशी बदलत राहतात. या स्थितीला गोचर म्हणतात. यामध्ये एका राशीतून बाहेर पडल्यानंतर ग्रह दुसऱ्या राशीत जातो. दुसरीकडे बुध ग्रहाने मेष राशीत प्रवेश केलाय. हा ग्रह 7 जूनपर्यंत या राशीत राहणार आहे. दरम्यान बुधाचे हे परिवर्तन सर्व राशींवर परिणाम करण्याची शक्यता आहे. 10 मे रोजी ग्रहांचा राजकुमार बुध ग्रहाचा मेष राशीमध्ये उदय होणार आहे. 

दरम्यान बुध ग्रहाच्या उदयामुळे 3 राशीच्या व्यक्तींना काळजी घ्यावी लागणार आहे. या 3 राशीच्या व्यक्तींना या काळात अडचणींचा सामना करावा लागणार आहे. जाणून घेऊया या 3 राशी कोणत्या आहेत. 

मेष रास

या राशीच्या राशीच्या लोकांसाठी बुध अप्रभावी ठरणार आहे. बुध ग्रहाता उदय या राशीच्या व्यक्तींसाठी धोकादायक ठरणार आहे. या काळामध्ये तुम्ही करणारा प्रवास तुम्हाला थकवा वाटू शकतो. तुम्हाला कोणत्या कामासाठी गरज असेल तेव्हा मदतीला कोणीही येणार नाही. शत्रूकडून काही समस्यांना सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. कुटुंबाकडून तुम्हाला सहकार्य मिळू शकणार नाही. 

कन्या रास

बुध ग्रहाच्या उदयामुळे तुमच्या आयुष्यात असंख्य अडचणी निर्माण होऊ शकतात. बुधाच्या उदयामुळे तुम्हाला आरोग्याशी संबंधित काही समस्यांना सामना करावा लागणार आहे. या काळात तुम्हाला खर्चावर नियंत्रण ठेवावं लागू शकतं, कारण भरपूर खर्च होण्याची चिन्ह आहेत. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्हाला सर्व गोष्टी तपासून घ्याव्या लागतील. गरज असेल तर पैशांची गुंतवणूक करावी. या काळात तुम्ही तुमच्या कुटुंबाला पूर्ण वेळ देऊ न शकल्याने त्यांचा रोष पत्करावा लागू शकतो.

वृश्चिक रास

या राशीच्या राशीच्या व्यक्तींसाठी बुधाचा उदय घातक ठरण्याची शक्यता आहे. या काळामध्ये कोणत्याही प्रकारचा घोटाळा करू नये. तुमच्या हाती जे काम आहे, ते प्रामाणिकपणे करण्याचा सल्ला देण्यात येतोय. कामाच्या ठिकाणी किंवा व्यापारामध्ये तुम्हाला अनेक अडचणी झेलाव्या लागू शकतात. या काळामध्ये खर्च अधिक होणार असून तुमच्यावर कर्ज घेण्याचीही वेळ येऊ शकते. त्यामुळे खर्चाला नियंत्रित ठेवावं लागणार आहे. वैवाहिक आयुष्यात वाद होणार नाही याची काळजी घ्यावी. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)