Cancer Horoscope 2024 : नवीन वर्ष 2024 हे कर्क राशीच्या लोकांसाठी कसं असेल? आर्थिक आणि करिअर राशीभविष्य

Cancer Horoscope 2024 : येणारं नवीन वर्ष 2024 हे कर्क राशीच्या लोकांसाठी आर्थिक आणि करिअरदृष्टीकोनातून कसं असेल हे जाणून घ्या.

नेहा चौधरी | Updated: Dec 12, 2023, 04:29 PM IST
Cancer Horoscope 2024 : नवीन वर्ष 2024 हे कर्क राशीच्या लोकांसाठी कसं असेल? आर्थिक आणि करिअर राशीभविष्य title=
Cancer horoscope 2024 how will 2024 be for Cancer people financial and career horoscope kark Rashifal

Cancer Horoscope 2024 : ज्योतिषशास्त्रानुसार कर्क राशीचा स्वामी चंद्र असून चंद्र हा मनाचा कारक आहे. 2024 हे वर्ष तुमच्यासाठी चढ-उतारांनी भरलेले असणार आहे. कारण वर्षाच्या सुरुवातीलाच शनीचा प्रभाव तुमच्यावर पडणार असून तुमच्या कुंडलीत चांडाळ योगही तयार होणार आहे. तर 1 जानेवारी 2023 च्या तुमच्या संक्रमण कुंडलीत ग्रहांची स्थिती पाहिली तर तुमच्या भाग्यस्थानात राहु तुमचं नशीब पालटणार आहे. केतू ग्रह तुमच्या शौर्याच्या स्थानात असल्याने तुमचं शौर्य वाढणार आहे. तुमच्या लोकप्रियतेतही वाढ होणार आहे. महिन्याच्या सुरुवातीला पाचव्या भावात लक्ष्मी नारायण निर्माण होणार आहे. गुरु ग्रह कर्म घरामध्ये असून 1 मे रोजी उत्पन्न आणि लाभाच्या घरात प्रवेश करणार आहे. सूर्य ग्रह सहाव्या भावात असणार आहे. त्यामुळे तुम्ही शत्रूंवर मात करण्यात यशस्वी होणार आहे. पण शनिदेव आठव्या घरात भ्रमण असल्याने शनीची धैय्या फिरत असणार आहे. ज्याचा तुम्हाला थोडा त्रास होणार आहे. कर्क राशीच्या लोकांसाठी 2024 हे वर्ष करिअर, व्यवसाय आणि कौटुंबिक जीवनासाठी कसे असेल जाणून घेऊयात. (Cancer horoscope 2024 how will 2024 be for Cancer people financial and career horoscope kark Rashifal)

कर्क राशीच्या लोकांसाठी व्यवसायाच्या दृष्टीकोनातून 2024 कसं?

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार कर्क राशीच्या लोकांसाठी 2024 हे वर्ष काम आणि व्यवसायाच्या दृष्टीने चांगल असणार आहे . कारण तुमच्या संक्रमण कुंडलीत केतू ग्रह तिसऱ्या भावात असून त्याची नववी राशी उत्पन्नाच्या घरावर असेल.तर  वर्षभर केतू तुमच्या कुंडलीत असणार आहे. त्यामुळे यावेळी तुमचं उत्पन्न वाढणार आहे. इथे उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होणार आहे. तसंच राहू ग्रह तुमच्या राशीतून नवव्या भावात स्थित असणार आहे. त्यामुळे या वर्षी धार्मिक कार्यात तुमचा रस वाढणार आहे. राहू तुमच्यासाठी नशीब उजळवणारा ठरणार आहे. तुमचे प्रलंबित कामं पूर्ण होणार आहे.

हेसुद्धा वाचा - Aries Horoscope 2024 : 2024 हे वर्ष मेष राशीच्या लोकांसाठी कसं असेल? आर्थिक आणि करिअर राशीभविष्य

गुरु दशम भावात असल्याने नोकरदार लोकांना प्रमोशन मिळण्याची दाट शक्यता आहे. 1 मे नंतर बृहस्पति ग्रह उत्पन्न आणि लाभ स्थानात जाणार आहे. त्याशिवाय केतू ग्रहमान असल्यामुळे नफा दुप्पट होणार आहे. तसंच उत्पन्नातही प्रचंड वाढ होणार आहे. नवीन वर्षात योजना यशस्वी होऊन गुंतवणुकीतून लाभ होणार आहे. नवीन कामही सुरू करणार आहात. पण शनीची वाईट नजर तुमच्या कर्म भावावर असणार आहे. त्यामुळे नोकरदारांनी कामाच्या ठिकाणी राजकारणापासून दूर राहणे तुमच्या हिताचं ठरेल. नाही तर तुमचं मोठं नुकसान होईल. 

हेसुद्धा वाचा - Taurus Horoscope 2024 : नवीन वर्ष 2024 हे वृषभ राशीच्या लोकांसाठी कसं असेल? आर्थिक आणि करिअर राशीभविष्य

कर्क राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती 

जर आपण 2024 मध्ये कर्क राशीच्या लोकांच्या आर्थिक स्थितीबद्दल बोललो तर वर्षाच्या सुरुवातीपासून तुमची आर्थिक स्थिती हळू हळू सुधारणार आहे. कारण राहू आणि केतू तुम्हाला लाभदायक ठरणार आहे. या वर्षी तुम्ही एप्रिल महिन्यानंतर वाहने आणि मालमत्ता खरेदी करण्याचे योग आहेत.  

हेसुद्धा वाचा - Gemini Horoscope 2024 : नवीन वर्ष 2024 हे मिथुन राशीच्या लोकांसाठी कसं असेल? आर्थिक आणि करिअर राशीभविष्य

कर्क राशीच्या लोकांचे करिअर आणि शिक्षण 

कर्क राशीच्या विद्यार्थ्यांसाठी 2024 हे वर्ष उत्तम असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घ्यायचं आहे त्यांना मार्च महिन्यात परदेशी जाण्याचे योग आहेत. परदेशात नोकरीचीही उत्तम संधी आहे. तसंच एप्रिलपासून वेळ चांगला असणार आहे. तुम्हाला कोर्समध्ये चांगले मार्क्स मिळण्याची शक्यता आहे. तर जे सरकारी नोकरीसाठी तयारी करत आहेत त्यांना नोकऱ्या मिळण्याची दाट शक्यता आहे. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)