Navratri 2023 Maha Ashtami : आज महाअष्टमी! 700 वर्षांनंतर ग्रहांचा महायुगामुळे 'या' राशींचं भाग्य पलटणार

Chaitra Navratri 2023 : देवीच्या 9 रुपांची मनोभावे पूजाअर्चा करण्यात येतं आहे. आज बुधवार आणि आज महाअष्टमी...ज्योतिषशास्त्रानुसार 700 वर्षांनंतर महाष्टमीला ग्रहांचा अतिशय शुभ संयोग जुळून आला आहे. या संयोगामुळे काही राशींच्या लोकांचं भाग्य सोन्यासारखं चमकरणार आहे.

Updated: Mar 29, 2023, 06:42 AM IST
Navratri 2023 Maha Ashtami : आज महाअष्टमी! 700 वर्षांनंतर ग्रहांचा महायुगामुळे 'या' राशींचं भाग्य पलटणार
Chaitra Navratri 2023 Maha Ashtami shubh sanyog after 700 years lucky zodiac signs in marathi

Chaitra Navratri 2023 Maha Ashtami lucky zodiac signs in marathi : आज चैत्र नवरात्रीमधील महाअष्टमी...आज 700 वर्षांनंतर ग्रहांचा दुर्मिळ संयोग जुळून आला आहे. ज्योतिष शास्त्रानुसार आज चार राशींमध्ये 6 प्रमुख ग्रह विराजमान (Planet Alignment) होणार आहेत. गुरुने मीन राशीत प्रवेश केला आहे. बुध मेष राशीत, सूर्य मीन राशीत आणि शनि कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. तर शुक्र आणि राहू मेष राशीत विराजमान असणार (Planet parade) आहे. 

या दुर्मिळ संयोगामुळे ज्योतिषशास्त्रानुसार मालव्य, केदार, हंस आणि महाभाग्य योगायोग निर्माण झाला आहे. या योगामुळे चार राशींच्या लोकांना बंपर धनलाभ आणि प्रगती होणार आहे. चला जाणून घेऊयात कुठल्या आहेत त्या राशी...(Chaitra Navratri 2023 Maha Ashtami shubh sanyog after 700 years lucky zodiac signs in marathi)

मिथुन (Gemini)

या राशीच्या लोकांसाठी ग्रहांचा हा संयोग भाग्यवान ठरणार आहे. त्यांना चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. तर वैवाहिक जीवनात आनंद असणार आहे. राजयोगामुळे प्रत्येक कामात त्यांना यश मिळणार आहे. 

कर्क (Cancer)

कर्क राशीच्या लोकांसाठी हंस आणि मालव्य राजयोगामुळे शुभदायक ठरणार आहे. समाजात मान सन्मान वाढणार आहे. अचानक धन लाभ होणार आहे. मनाजोगी नोकरीची संधी मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी सहकार्य मिळणार आहे. 

कन्या (Virgo)

या राशीच्या लोकांसाठी हा सर्वात उत्तम काळ असणार आहे. व्यवसाय आणि नोकरीच्या ठिकाणी चांगली बातमी मिळणार आहे. गुंतवणुकीचे नवीन मार्ग दिसणार आहे.  एकंदरीत हा काळ त्यांचासाठी भाग्यशाली ठरणार आहे. 

मीन (Pisces)

या राशीसाठी ग्रहांचा दुर्मिळ योग अनेक चांगल्या गोष्टी घेऊन आला आहे. समाजात आदर वाढणार आहे. रखडलेली कामं मार्गी लागणार आहे. कष्टाचं फळ देणारा हा योग ठरणार आहे. घरात आनंदाचं वातावरण असणार आहे. 

हेसुद्धा वाचा - Navratri 2023 Kanya Pujan : चैत्र नवरात्रीमध्ये कधी आहे कन्यापूजन? जाणून घ्या तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धती आणि नियम

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)