Todays Panchang : आज बुधवार. सध्या सुरु असणाऱ्या चैत्र नवरात्रोत्सवाच्या पर्वातील आज अत्यंत महत्त्वाचा दिवस. या दिवशी काही असे योग तयार होत आहेत जे भारावणारे आबेत. ज्योतिष अभ्यासक आणि जाणकारांच्या म्हणण्यानुसार तब्बल 700 वर्षांनंतर आजच्या महाअष्टमीचा योग साकारला गेला आहे.
हा दिवस अतिशय शुभ असून, तुम्ही एखादं शुभकार्य किंवा एखादं नवं काम हाती घेण्याच्या विचारात असाल तर ते तातडीनं उरका. कारण, असा दिवस पुन्हा येणे नाही. आजच्या दिवसाचं महत्त्वं नेमकं काय आहे हे जाणून घेण्यासाठी पाहा आजचं पंचांग. जिथं तुम्हाला सर्व महत्त्वाच्या वेळा आणि नक्षत्रांविषयीही माहिती मिळणार आहे.
आजचा वार - बुधवार
तिथी- अष्टमी
नक्षत्र - आर्द्रा
योग - शोभन
करण- विष्टी, बव
सूर्योदय - सकाळी 06:15 वाजता
सूर्यास्त - संध्याकाळी 06.37 वाजता
चंद्रोदय - 11:33
चंद्रास्त - 02:15
चंद्र रास- मिथुन
दुष्टमुहूर्त– 12:01:34 पासुन 12:51:01 पर्यंत
कुलिक– 12:01:34 पासुन 12:51:01 पर्यंत
कंटक– 16:58:17 पासुन 17:47:44 पर्यंत
राहु काळ– 12:26:17 पासुन 13:59:01 पर्यंत
कालवेला/अर्द्धयाम– 07:04:51 पासुन 07:54:18 पर्यंत
यमघण्ट–08:43:45 पासुन 09:33:12 पर्यंत
यमगण्ड– 07:48:07 पासुन 09:20:51 पर्यंत
गुलिक काळ– 10:53:34 पासुन 12:26:17 पर्यंत
अभिजीत मुहूर्त - आज मुहूर्त नाही
चंद्रबलं आणि ताराबल
ताराबल - उत्तरा फाल्गुनी, चित्रा, स्वाति, विशाखा, अनुराधा, मूळ, उत्तराषाढ़ा, धनिष्ठा, शतभिष, पूर्वाभाद्रपद, उत्तराभाद्रपद, अश्विनी, कृत्तिका, मृगशिरा, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, माघ
चंद्रबल - मेष, मिथुन, सिंह, कन्या, धनु, मकर
(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)