Chanakya Niti: पती पत्नीचं नातं असं असावं, अन्यथा मीठाचा खडा पडलाच समजा

लग्नानंतर पती-पत्नीमध्ये कोणत्या गोष्टी असणं गरजेचं आहे. ते जाणून घ्या जेणेकरून तुमचं वैवाहित आयुष्य सुखी राहिल...

Updated: Jan 16, 2023, 06:32 PM IST
Chanakya Niti: पती पत्नीचं नातं असं असावं, अन्यथा मीठाचा खडा पडलाच समजा title=

Chanakya Niti for Wife Husband:  रोजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत चाणक्य नीति खूप महत्त्वाची ठरते. कारण चाणक्य नीतित सांगितलेली मूल्य आजही तंतोतंत लागू होतात. त्यामुळे खऱ्याखुऱ्या आयुष्यात चाणक्य नीति अवलंबण्यासाठी खटाटोप असतो. लग्नानंतर आयुष्य आनंदी जावं यासाठी नीतिशास्त्रात अनेक बाबी अधोरेखित करण्यात आल्या आहेत. लग्नानंतर पती पत्नीनी या गोष्टी लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. यामुळे वैवाहिक जीवन सुखात जाईल. चला जाणून घेऊयात चाणक्य नीतित काय सांगितलं आहे. तसेच जोडीदारासोबत आपलं नातं कसं मजबूत राहील जाणून घ्या.

एकमेकांचा आदर करावा (Respect Each other) - वैवाहिक जीवनात कोणताही अडसर येऊ नये यासाठी पती पत्नींनी एकमेकांचा आदर करणं महत्त्वाचं आहे. प्रेम व्यक्त करण्यासोबतच विचारांचा देखील आदर केला पाहीजे. यामुळे पती-पत्नीचं नात आणखी खुलतं. एकमेकांचा आदर करण्यासोबत मान-सन्मान दिला पाहीजे.

अहंकार बाळगू नये (Keep Your Attitude Away)  - आचार्य चाणक्य यांच्या नीतिशास्त्रानुसार, सुखी संसाराची गाडी पतीपत्नी या दोन चाकांवर धावते. त्यामुळे कुणी एकाने अहंकार बाळगणं म्हणजे सुखी संसारावर पाणी फिरवल्यासारखं आहे. पती पत्नीने कोणत्याही गोष्टीचा गर्व करू नये. तसेच एखादी कमतरता असल्यास ती मोठ्या मनाने स्वीकारून पुढे जाणं गरजेचं आहे.

हेही वाचा : Dream Astrology: या '5' स्वप्नांमुळे मिळतात श्रीमंतीचे संकेत, काय काय असते वाचा

धीर धरा (stay Clam) - संसाराचं गाडं पुढे नेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यामुळे संयम ठेवणं महत्त्वाचं आहे. कारण अडचणीच्या काळातच खरी कसोटी लागते. त्यामुळे पती पत्नींनी एकमेकांचा आदर करण्यासोबतच कठीण काळात संयम बाळगणं गरजेचं आहे.

खासगी गोष्टी कुणालाही सांगू नका (Do not Share Your Personal Things With Others) - पती पत्नींचं नातं एका नाजूक धाग्यासारखं असतं. एकमेकांवर विश्वास असल्याने प्रत्येक गोष्ट सांगितली जाते. त्यामुळे नातं टिकवण्यासाठी बारीकसारीक गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे खासगी गोष्टी बाहेरच्या व्यक्तींना सांगणं पापच ठरेल. त्यामुळे नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)