Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतिशास्त्रात जीवनातील अनेक पैलूंवर प्रकाश टाकला आहे. आचार्य चाणक्य यांचे नीति धोरणं आजही तंतोतंत लागू होतात. त्यामुळे आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या ध्येय धोरणांबाबत कायमच उत्सुकता असते. आचार्य चाणक्य यांच्या मते, शांत आणि सुखी जीवन जगण्यासाठी कोणाशीही वाद घालू नये. मात्र अनेकदा इच्छा नसताना आपण वादात ओढले जातो आणि निरर्थक वाद होतो. चाणक्य नीतिमध्ये कोणत्या प्रकारच्या व्यक्तींशी वाद घालू नये, याबाबत सांगितलं आहे. या लोकांशी वाद घालणं महागात पडतं, शिवाय त्यांना राग अनावर झाल्यास आपल्या जीवावरही बेतू शकते.
शस्त्र जवळ असलेली व्यक्ती: आचार्य चाणक्य यांच्या मते, ज्या व्यक्तीच्या हातात शस्त्र असते, अशा व्यक्तींपासून दूर राहिलेलं बरं. या व्यक्तींशी कधीही भांडण करू नये. कारण रागाच्या भरात ती व्यक्ती काहीही करू शकते. तसेच हातातील शस्त्राचा वापर करून जीवघेणा हल्ला करू शकते.
गुपित माहित असलेला व्यक्ती: आचार्य चाणक्य यांच्या मते, गुपित माहित असलेल्या व्यक्तीसोबत कधीही भांडण करू नये. यामुळे संबंधित व्यक्ती आपलं गुपित उघड करू शकते. विभीषणाला रावणाचे गुपित माहिती होते. त्याने हे गुपित रामाला सांगितलं. त्यामुळे रावण युद्धात मारला गेला.
मूर्ख व्यक्ती: आचार्य चाणक्य यांच्या मते कधीही मूर्ख व्यक्तीसोबत भांडण करू नये. शास्त्रात अशा लोकांशी दोस्ती किंवा शत्रुत्व करू नये, असं सांगितलं आहे. कारण अशा लोकांना चांगलं-वाईट यातला फरक कळत नाही. यामुळे आपलं नुकसान होऊ शकतं.
श्रीमंत व्यक्ती: चाण्यक्य नीतिनुसार श्रीमंत आणि बलवान व्यक्तीशी कधीही भांडण करू नये. कारण अशी व्यक्ती पैसा आणि शक्तिच्या जोरावर आपल्याला चीतपट करू शकतो. यासाठी अशा व्यक्तींपासून दूर राहणं आवश्यक आहे.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)