Chandra Grahan 2024 : 100 वर्षांनंतर चंद्राचा छायेत होळी! वर्षातील पहिलं चंद्रग्रहण भारतात दिसणार? पाहा सूतक काल अन् मान्यता

Chandra Grahan 2024 : या वर्षातील पहिलं ग्रहण हे चंद्रग्रहण असून ते तब्बल 100 वर्षांनी होळीच्या दिवशी आलंय. त्यामुळे होळीच्या सणावर ग्रह्रणाची सावली आहे, असं म्हटलं जातंय. नेमकं चंद्रग्रहण भारतात दिसणार का? सूतक काल कधी असून गर्भवती महिलांनी काय काळजी घ्यावी. अशा अनेक प्रश्नांची उत्तर एका क्लिकवर. 

नेहा चौधरी | Updated: Mar 24, 2024, 03:03 PM IST
Chandra Grahan 2024 : 100 वर्षांनंतर चंद्राचा छायेत होळी! वर्षातील पहिलं चंद्रग्रहण भारतात दिसणार? पाहा सूतक काल अन् मान्यता  title=
chandra grahan 2024 on holi and time lunar eclipse dos and donts india sutak kaal timing

Lunar Eclipses 2024 :फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी होलिका दहन आणि त्याचा दुसऱ्या दिवशी होळी किंवा धुरवड किंवा धुलिवंदन साजरा करण्यात येतो. यंदाचा होळी अतिशय खास आहे. कारण तब्बल 100 वर्षांनंतर होळीच्या दिवशी चंद्रग्रहण असणार आहे. यावर्षातील पहिलं चंद्रग्रहण हे होळीच्या दिवशी सोमवारी 25 मार्चला असणार आहे. चंद्रग्रहण ही एक खगोलशास्त्रीय घटना असून ज्योतिषशास्त्रातही त्याला अशुभ मानलं जातं. ज्योतिषशास्त्रानुसार हे चंद्रग्रहण कन्या राशीत होणार आहे. अशा स्थितीत चंद्रग्रहणाच्या छायेत होळीचा सण साजरा करता येणार का? चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे का? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तर जाणून घ्या.  (chandra grahan 2024 on holi and time lunar eclipse dos and donts india sutak kaal timing)

चंद्रग्रहणाची वेळ काय आहे? (Chandra Grahan 2024 Date and Time)

वर्षातील पहिलं चंद्रग्रहण सोमवार 25 मार्च, होळीच्या दिवशी सकाळी 10:24 ते दुपारी 03:01 वाजेपर्यंत असणार आहे. याचा अर्थ चंद्रग्रहणाचा एकूण कालावधी 4 तास 36 मिनिटं असणार आहे. 

चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे? (Chandra Grahan Where watch in India)

खगोलशास्त्रज्ञांनुसार होळीच्या दिवशी असणारे चंद्रग्रहण हे भारतात दिसणार नाही आहे. त्यामुळे या चंद्रग्रहण होळीच्या सणावर होणार नाही. या वर्षातील पहिलं चंद्रग्रहण ईशान्य आशिया, युरोप, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, जपान, रशिया, आयर्लंड, इंग्लंड, स्पेन, पोर्तुगाल, इटली, पॅसिफिक, अटलांटिक आणि आर्क्टिक महासागर इथे दिसणार आहे. 

सुतक कालावधी वैध असेल का? (Chandra Grahan 2024 Sutak Kaal Timing)

ज्योतिषशास्त्रानुसार चंद्रग्रहणाच्या 9 तास आधीपासून सुतक काल सुरु होत असतो. हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही त्यामुळे भारतीयांना सुतक काल पाळयाचा नाही. सुतक काळात देवी-देवतांची पूजा किंवा शुभ कार्ये करण्यास बंदी आहे. 

पेनम्ब्रल ग्रहण म्हणजे काय?

होळीच्या दिवशी असणारे ग्रहण हे पेनम्ब्रल चंद्रग्रहण असणार आहे. खगोलशास्त्रज्ञांनुसार चंद्र जेव्हा पृथ्वीच्या मध्याभागी प्रवेश करतो त्याला चंद्रग्रहण असं म्हणतात. तर चंद्र पृथ्वीच्या पेनम्ब्रामध्ये प्रवेश करतो आणि बाहेर पडतो. या स्थितीत तू चंद्र अस्पष्ट दिसतो त्याला पेनम्ब्रल चंद्रग्रहण असं म्हणतात. 

चंद्रग्रहणाचा राशींवर होणारा परिणाम (Chandra Grahan 2024 Impact on zodiac signs)

ज्योतिषशास्त्रानुसार होळीला असणारे चंद्रग्रहण मिथुन, सिंह आणि मकर राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली असणार आहे. या लोकांना आर्थिक लाभासह आरोग्यासाठी लाभदायक ठरणार आहे. तर दुसकीकडे मेष, कर्क, कन्या, कुंभ आणि मीन या राशींसाठी चंद्रग्रहण घातक ठरणार आहे. या लोकांना अनेक समस्यांना तोंड द्याव लागणार आहे. 

गरोदर महिलांनी या चुका करू नये (Chandra grahan pregnant women precautions)

1. चंद्रग्रहण काळात गर्भवती महिलांनी घराबाहेर जायला नको. 

2. चंद्रग्रहण काळात गर्भवती महिलांनी स्वयंपाक करु नये. शिवाय काही खाऊ नयेत. 

3. गरोदर महिलांनी चंद्रग्रहण काळात चाकू, कात्री किंवा कोणतीही तीक्ष्ण वस्तूंपासून दूर राहावे. 

चंद्रग्रहणाच्या वेळी ही काळजी घ्या (Chandra grahan Do's and donts)

1. चंद्रग्रहण काळात रागावर नियंत्रण ठेवावं.

2. चंद्रग्रहण काळात काही खाऊ नये.

3. चंद्रग्रहण काळात कोणत्याही निर्जन ठिकाणी किंवा स्मशानभूमीत जाऊ नका. 

4. चंद्रग्रहण काळात नवीन कार्याची सुरुवात करुन नका. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)